मैत्रिणीच्या वडिलांनीच केला बलात्कार, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना दक्षिण मुंबईत घडली होती. पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करणारा आरोपी पीडितेच्या मैत्रिणीचाच बाप आहे. वारंवार लहान मुलांना मारहाण आणि त्याचा लैगिंक छळ करणाऱ्या प्रकरणातील आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यांच्या मुलीच्या आठ वर्षाच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याला अग्रीपाडा भागातून […]
ADVERTISEMENT

आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना दक्षिण मुंबईत घडली होती. पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करणारा आरोपी पीडितेच्या मैत्रिणीचाच बाप आहे.
वारंवार लहान मुलांना मारहाण आणि त्याचा लैगिंक छळ करणाऱ्या प्रकरणातील आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यांच्या मुलीच्या आठ वर्षाच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याला अग्रीपाडा भागातून अटक करण्यात आली.
महालक्ष्मी जवळ धोबीघाट परिसरात राहणाऱ्या आरोपी रवींद्र घाडगेवर अल्पवयीन मुलांचा लैगिंक छळ, तसेच चोऱ्या यासारखे गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे आहेत. आरोपीने ज्या आठ वर्षाच्या पीडितेवर बलात्कार केला, ती त्याच्या मुलीची मैत्रीण आहे.
घाडगे तिला ओळखायचा कारण ती नेहमी त्याच्या मुलीसोबत खेळायची. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुलगी अचानक रडायला लागली आणि तिने पोटात दुखत सांगत असल्याचं सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला.
३८ वर्षाच्या आरोपीला पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे आणि पोलीस निरीक्षक योगेश टांडे यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आलं होतं.
एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, आरोपी बेरोजगार आहे आणि ड्रग्जच्या आहारी गेलेला आहे. तो पीडित मुलीला ओळखायचा. तिच्या आजूबाजूलाच असायचा आणि आरोपीची मुलगी पीडित मुलीची मैत्रीण आहे.
मुलीच्या आजीने निर्भय पथकाला बोलावून घेतलं आणि घाडगेला ओळखायला आणि पकडायला मदत केली. पोलिसांनी आरोपीला धोबी घाट येथील गेट नंबर ४ वरून अटक केली. १२ तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी आरोपीचे कपडे तपासणीसाठी जप्त केले आहेत. त्याचबरोबर त्याच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल यायचा आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. अग्रीपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या नावे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३७६ ब आणि ५०९ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४,५,६,१० आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.