भिवंडी : बायकोशी प्रेमसंबंध असल्याचा नवऱ्याला संशय, पतीने तरुणावर धारदार शस्त्राने केले वार अन्...
Bhiwandi crime : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन ओळखीच्याच व्यक्तीवर धारदार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला एका मुंबईतील रुग्णालयात रेफर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
35 वर्षीय तरुणाने 20 वर्षीय तरुणावर धारदार शास्त्राने केले वार
नीरजला रुग्णालयात केले दाखल
Thane Crime : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन ओळखीच्याच व्यक्तीवर धारदार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला एका मुंबईतील रुग्णालयात रेफर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : 90 वयाच्या वृद्ध महिलेवर सामूहिक अत्याचार, नराधमांनी ओलांडली क्रूरतेची परिसिमा
35 वर्षीय तरुणाने 20 वर्षीय तरुणावर धारदार शास्त्राने केले वार
घडलेल्या घटनेनुसार, संबंधित घटना ही ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील कामठघर परिसरात 4 मार्च रोजी पहाटे घडली होती. विजय राघो साहा (वय 35) याने नीरज सुभाष साहा (वय 20) याच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला नीरजचे त्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयावरून तो संतापला आणि त्याने नीरजवर हल्ला केला. या हल्ल्यात नीरजला गंभीर दुखापत झाली होती.
नीरजला रुग्णालयात केले दाखल
या घटनेनंतर त्याला जवळच्या लोकांनी जखमी नीरजला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. पण प्रकृती बघता त्याला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले होते, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपी आणि पीडित दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. नीरजवर संशयाने ही घटना घडली.










