
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांनाही मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांबाबत जी भूमिका घेतली होती त्यामुळे मनसे चांगलीच आक्रमक झाली होती. औरंगाबादमधली सभा झाल्यानंतर आणि रमजान ईद झाल्यानंतर मनसेने आणखी आक्रमक धोरण घेतलं होतं.
अशात पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी धरपकड सुरू केली. याच दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी एक महिला कर्मचारी खाली पडली. त्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढल्या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अटकपूर्व जामिनासाठी या दोघांनीही अर्ज केला होता. त्या अर्जाला आज कोर्टाने मती दिली आहे.
राज ठाकरेंनी जो इशारा दिला होता त्यानंतर ४ मेपासून मोठे वादंग निर्माण झाले होते. महाविकास आघाडी आणि खासकरून शिवसेनेच्या नेत्यांनी यावरून मनसेला लक्ष्य केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरू आहे. अशातच आता हे दोघेही अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेल्याने त्यांना जामीन मंजूर होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या प्रकरणावर उद्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवसाबाहेर पोलिसांच्या तावडीतून सुटून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांनीही पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या दोघांवर महिला पोलीस अधिकाऱ्याला जखमी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
राज ठाकरेंनी ४ मेपासून मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा लावा असं आवाहन केलं होतं. त्यामुळे मनसे नेत्यांची धरकपकड सुरू करण्यात आली होती. याचवेळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही राज ठाकरेंच्या बंगल्याबाहेर आले असता त्यांनी तिथून पलायन केलं होतं. या सगळ्या घाईत एक महिला पोलीस कर्मचारी जमिनीवर कोसळली होती. त्याामुळे पोलिसांनी या दोघांविरोधात ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आज या दोघांना सेशन्स कोर्टाने दिलासा दिला आहे.
या दोघांविरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला तो अजामीनपात्र असल्याने दोघेही गायब होते. देशपांडे यांच्या कार चालकाला अटक करण्यात आली होती. आता संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघानाही सेशन्स कोर्टाने दिलासा दिला आहे.