राणा दाम्पत्याच्या जामिनाचा फैसला सोमवारी, आणखी दोन दिवस मुक्काम तुरुंगातच
Navneet Rana Latest News: अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. मुंबईच्या सेशन्स कोर्टातल्या एपी-एएमएलए कोर्टात सुनावणी सुरू आहे. राणा दाम्पत्याचे ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा यांनी कोर्टात युक्तीवाद केला. शुक्रवारी सुनावणी दरम्यान पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल करत राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. […]
ADVERTISEMENT

Navneet Rana Latest News: अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. मुंबईच्या सेशन्स कोर्टातल्या एपी-एएमएलए कोर्टात सुनावणी सुरू आहे. राणा दाम्पत्याचे ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा यांनी कोर्टात युक्तीवाद केला. शुक्रवारी सुनावणी दरम्यान पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल करत राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता.
आता नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांच्याही जामिनावर सोमवारी फैसला होणार आहे. या दोघांच्याही जामिनावर जी सुनावणी झाली त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या वकिलांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला.
राणा दाम्पत्याचा वकिलांनी सुनावणी दरम्यान सांगितलं की हे प्रकरण विना मुद्द्याचं आहे. राणा दाम्पत्य हे दोघंही निवडून आलेले नेते आहेत. ते कुठेही पळून जाणार नाहीत त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावून घेतलं जाऊ नये. पोलिसांनी त्यांच्या जामिनाला विरोध केला आहे, मात्र कस्टडी मागितलेली नाही. त्यामुळे अजूनही दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांना ८ वर्षांची मुलगी आहे. या दोघांना सशर्त जामीन मिळू शकतो, जामिनावर त्यांना सोडलं पाहिजे.