BMC : ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी, पण ‘या’ गोष्टी पाळाव्या लागणार; पोलिसांचा इशारा काय?
मुंबई महापालिकेच्या कामात नियमांचं पालन न करता गैरव्यवहार केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा (युबीटी) मोर्चा काढण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेच्या कामात नियमांचं पालन न करता गैरव्यवहार केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा (युबीटी) मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला परवानगी दिली असून, त्यासाठी नियम घालून दिले आहेत. नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांनी मोर्चा काढताना कोणते नियम घालून दिले?
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचा मोर्चा 1 जुलै रोजी दुपारी 2 वाजता वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो सिनेमा) येथून सुरूवात होऊन महानगरपालिका मार्गावरून मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत आयोजित केला असून, सदर ठिकाणी सभा सुद्धा होणार आहे. या दोन्हीही गोष्टी अतिशय शांततेने पार पाडावे.
– मोर्चा दिलेल्या मार्गावरुनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये. मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.
– आयोजित कार्यक्रमापूर्वी आवश्यक असलेल्या इतर शासकीय विभागाचे आवश्यक ते परवाने प्राप्त करावेत. तसेच आपले तर्फे उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबंधित ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम स्टेज स्टॅबिलिटी प्रमाणपत्र प्राप्त करुन सदरचे सर्व परवाने आझाद मैदान पोलीस ठाणे येथे कार्यक्रमापूर्वी सादर करावेत.










