Sion Accident : वाशिमचा दिनेश मुंबईत आला पण मृतदेहच घरी गेला, आईने फोडला टाहो
सायन स्टेशन रेल्वे अपघात : वाशिमच्या दिनेश राठोड या तरुणाला एका दाम्पत्याने मारहाण केली. यावेळी त्याचा तोल गेला आणि तो रुळावर कोसळला. त्यानंतर त्याचा चिरडून मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

-जका खान, वाशिम
Sion Station Accident : तारीख होती 13 ऑगस्ट. ठिकाण होतं सायन स्टेशन. एका तरुणाला महिला अचानक छत्रीने मारायला लागते. त्याचवेळी तिचा पती तरुणाला जोरात मारतो आणि तो तोल जाऊन रेल्वे रुळावर कोसळतो. त्यानंतर काही क्षणातच मृत्यू त्याचा घास घेतो. सायन स्टेशनवर लोकलखाली चिरडून मेलेल्या दिनेश राठोड या तरुणाचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. वाशिम जिल्ह्याचा रहिवाशी असलेल्या दिनेशचं कुटुंबावर या घटनेनं मोठा आघात झालाय. लेकाच्या दुःखाने आई कोलमडून गेलीये.
दिनेश राठोड हा मूळचा वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात असलेल्या किनखेडचा. दीड वर्षापूर्वी मुंबईत आला. बेस्ट मध्ये कंडक्टर म्हणून नोकरीला लागला. अलिकडे दिनेशला कायमस्वरुपी कर्मचारी करण्यात आले होते.
सायन स्टेशन अपघात : सीसीटीव्ही व्हायरल
13 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता हा प्रकार घडला होता. यात दिनेश राठोडचा लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये चेंगरून मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे पोलिसांनी माहिती दिल्यानंतर आई, भावंडासह सगळ्यांवर मोठा आघात झाला. दिनेशचा उतरताना लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितलं, असं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे.