युवा सेनेने आदित्य ठाकरेंची कट्टर समर्थक गमावली; दुर्गा भोसलेंचं निधन
आदित्य ठाकरे यांच्या कट्टर समर्थक आणि युवा सेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे ठाण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झालं.
ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंची कट्टर समर्थक आणि युवा सेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झालं. ठाकरे गटाच्या ठाण्यातील मोर्चात चालत असताना दुर्गा भोसले-शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना रुग्णायलयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दुर्गा भोसले-शिंदेंच्या निधनानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं.
ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आल्याच्या विरोधात जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गटाकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. याच मोर्चात आदित्य ठाकरेंसोबत 30 वर्षीय युवा सेना सचिव दुर्गा भोसले-शिंदेही सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा >> ‘बावन’ आणे, कमळबाई आणि शिंदेंचे शाप; शिवसेनेचा (UBT) भाजपवर घणाघात
मोर्चात कार्यकर्त्यांसोबत घोषणा देत त्या चालत होत्या. मोर्चात चालत असताना दुर्गा यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दुर्गा भोसले यांची युवासेनेच्या कर्तृत्ववान पदाधिकारी अशी ओळख होती. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.