नाशिकमध्ये दिवसभरात १ हजार ३३० Corona रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

मुंबई तक

नाशिकमध्ये दिवसभरात १ हजार ३३० कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर सहा रूग्णांच्या मृत्यूंची नोंद जाली आहे. नागपूर पाठोपाठ नाशिकमध्येही रूग्ण वाढले आहेत हेच या अहवालावरून दिसतं आहे. नाशिकमध्ये आज ४ हजार ५२५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आत्तापर्यंत नाशिकमध्ये कोरोनाची बाधा होऊन १ हजारपेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एककीडे नागपूर आणि पुण्यात रूग्णसंख्या वाढत आहे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नाशिकमध्ये दिवसभरात १ हजार ३३० कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर सहा रूग्णांच्या मृत्यूंची नोंद जाली आहे. नागपूर पाठोपाठ नाशिकमध्येही रूग्ण वाढले आहेत हेच या अहवालावरून दिसतं आहे. नाशिकमध्ये आज ४ हजार ५२५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आत्तापर्यंत नाशिकमध्ये कोरोनाची बाधा होऊन १ हजारपेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एककीडे नागपूर आणि पुण्यात रूग्णसंख्या वाढत आहे त्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही पॉझिटिव्ह रूग्ण वाढू लागल्याची चिन्हं आहेत.

कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नाशिकमध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणारं साहित्य संमेलनही रद्द करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. नाशिकमध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढते आहे. अशा परिस्थितीत संमेलनासाठी येणारे साहित्यिक व बाहेरगावातून येणाऱ्या साहित्यप्रेमींच्या आरोग्याचा विचार करत महामंडळाने संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

८ मार्चला म्हणजेच दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मंगळवारी मध्यरात्रीपासून अंशतः लॉकडाऊनही लागू झाला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली. नाशिकमध्ये सर्व व्यवहार सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत सुरु असणार आहेत. मात्र रात्री 7 वाजेनंतर निर्बंध असणार आहे. तसेच 4 तालुक्यातील शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 15 मार्चनंतर लग्नसोहळ्यास मंगल कार्यालयात परवानगी नसेल.

नाशिकमध्ये आणखी कोणते निर्बंध असणार-

बार, हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी

जिम, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर फक्त व्यक्तिगत वापरासाठी परवानगी

सर्व धार्मिक स्थळं सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले राहील. मात्र शनिवार, रविवार पूर्णपणे बंद राहतील.

गर्दी होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना बंदी

भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार.

हे वाचलं का?

    follow whatsapp