कबड्डीपटूची हत्या : "ती त्याला भावासारखं मानायची, तीन महिन्यापूर्वी हे कानावर आलं होतं"

मयत क्षितिजाचा मामाने केली शासनाकडे कळकळीची विनंती : आरोपी मावशीकडे राहायचा, हॉटेलमध्ये काम करायचा
कबड्डीपटूची हत्या : "ती त्याला भावासारखं मानायची, तीन महिन्यापूर्वी हे कानावर आलं होतं"
माध्यमांशी बोलताना क्षितिजाचे मामा आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी.

पुण्यात मन विषण्ण करणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने 14 वर्षाच्या क्षितिजाचं आयुष्यचं हिरावून घेतलं. कबड्डी खेळत असताना आरोपीने क्षितिजावर कोयत्याने वार केले आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच ती गतप्राण झाली. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, घटनेचे वेगवेगळे पैलू आता समोर येत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे आरोपीला क्षितिजा भावासारखं समजायची, अशी माहिती तिचे मामा अमोल शिंदे यांनी दिली. हे सांगतानाच शिंदे यांनी सरकारकडे लवकरात लवकर न्याय देण्याची कळकळीची विनंती केली आहे.

'ती माझी भाची होती. माझं म्हणणं एव्हढच आहे की, यामागे कुणीतरी मोठा सूत्रधार आहे. मोठा सुत्रधार असल्याशिवाय कोणताही गुन्हेगार एवढा मोठा गुन्हा करू शकत नाही. शासनाला माझी विनंती आहे की, असे प्रकार सारखे होत राहिले तर आम्ही करायचं काय? इतरांनी काय करायचं?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माध्यमांशी बोलताना क्षितिजाचे मामा आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी.
पुणे : मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेलीये; अजित पवारांना संताप अनावर

'यामागे जो कुणी असेल त्याला वकील मिळू नये. जी कुणी लोक असतील त्यांचं कुणी समर्थन करू नये. एवढीच माझी विनंती आहे. शासनाला विनंती आहे की, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावं. आम्हाला लवकरात लवकर न्याय हवाय. लवकर न्याय मिळाला तर वचक बसेल. यातून इतर गुन्हेगारांनाही समज जायला हवी', असं ते म्हणाले.

'ती त्याला भावासारखं समजायची. आरोपी तिच्या मावशीकडेच राहत होता. नातेवाईकच होता, पण मावशीकडे राहायचा. मला असं कळलंय की, तो ज्या हॉटेलमध्ये कामाला होता. त्या हॉटेलचा मालकच त्याला तू कर आम्ही तुला सपोर्ट करतो असं म्हणून पाठिंबा देत होता. मला ही माहिती मिळालीय. पण, मला सरकारला इतकंच म्हणायचं की त्यांनी सूत्रधारांना समोर आणावं. तीन महिन्यांपूर्वीच आमच्या कानावर हा विषय आला होता. आम्ही त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला होता', अशी माहिती मयत क्षितिजाचा मामा अमोल शिंदे यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना क्षितिजाचे मामा आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी.
पुणे हादरलं! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा अंदाज

दरम्यान, 'आरोपींची रिमांड घेतली जाईल. पुरावे जमा करुन लवकरात लवकर आरोपपत्र दाखल कऱण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे. प्रकरण फास्ट ट्रॅकला आणून लवकरात लवकर निकाल लागेल, यासाठी प्रयत्न करु', अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in