वडील-मुलीच्या नात्याला काळीमा, लैंगिक अत्याचार करून 16 महिन्यांच्या चिमुकलीचा खून

वडील-मुलीच्या नात्याला काळीमा, लैंगिक अत्याचार करून 16 महिन्यांच्या चिमुकलीचा खून
Aajtak

विजयकुमार बाबर, प्रतिनिधी, सोलापूर

हैदराबाद या ठिकाणी वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने अवघ्या 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही. त्या मुलीचा गळा दाबून तिची हत्याही त्याने केली. धक्कादायक बाब ही की बापाच्या या लाजिरवाण्या आणि तेवढ्याच चिड आणणाऱ्या अमानुष कृत्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला त्याच्या पत्नीने मदत केली. या प्रकरणी या दोघांनाही सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

(प्रातिनिधिक फोटो)

सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह हैदराबाद येथे राहात होती. पीडितेची आई आणि लहान मुलगा हे झोपी गेले असताना बापाने मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सिकंदराबाद- राजकोट एक्सप्रेसने पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या मूळगावी राजस्थानकडे मुलीचा मृतदेह घेऊन जात असताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्याच्या पत्नीस ताब्यात घेतले.

वडील-मुलीच्या नात्याला काळीमा, लैंगिक अत्याचार करून 16 महिन्यांच्या चिमुकलीचा खून
रायगड : पोलिसाचा विवाहीत महिलेवर बलात्कार, पती आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी देत केले अत्याचार

या दोघांबाबत सिकंदराबाद- राजकोट एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संशय आला असताना प्रवाशांनी वाडी येथे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, गाडी वाडी स्थानकावर जास्त वेळ न थांबल्याने पुढे मार्गस्थ झाली. ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी (ता. 6) पहाटे 4 वाजता आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे क्रूर बापाची आणि त्याला या कृत्यात मदत करणाऱ्या आईची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लोहमार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सदरील गुन्हा हा हैदराबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक गणेश शिंदे यांनी दिली. पोलिस अधीक्षक (लोहमार्ग, पुणे) सदानंद वायसे- पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे गणेश शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी लोहमार्ग विभाग सोलापूर अप्पासाहेब चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in