दिवाळीत मामाच्या घरी निघालेल्या चिमुरड्यांवर काळाचा घाला, रस्ते अपघातात दोन्ही भावंडांचा मृत्यू

वसमत-नांदेड रोडवर झाला अपघात, भाचा-भाचीला घेऊन जाणारा मामाही अपघातात जखमी
दिवाळीत मामाच्या घरी निघालेल्या चिमुरड्यांवर काळाचा घाला, रस्ते अपघातात दोन्ही भावंडांचा मृत्यू
अपघातग्रस्त पिक-अप व्हॅन आणि मोटारसायकल

एकीकडे संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या दोन लहानग्या बहिण-भावाचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. वसमत-नांदेड रोडवर हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श सुरय्या आणि किर्ती सुरय्या हे सख्खे बहिण-भाऊ वीरेगाव येथून मामाच्या घरी दिवाळीसाठी जात होते. या प्रवासादरम्यान टाकळगाव पाटीवर एका पिकअप गाडीने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही भावंडांचा जागीच मृत्यू झाला.

आपल्या भाचा-भाचीला घरी घेऊन जाण्यासाठी आलेला मामा (राजू खिलारे वय २४) हा देखील या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिवाळीत भाऊबीजेचा सण हा पवित्र मानला जातो. परंतू तो सण साजरा करण्याआधीच दोन्ही भावंडांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे वसमत परिसरात शोकाकूल वातावरण असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in