चिंतेची बाब ! अमरावतीत आढळले Omicron चे दोन सब-व्हेरिएंट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा रुग्ण अमरावती शहरात पहिल्यांदा सापडला होता. यानंतर सध्या संपूर्ण देशासाठी चिंतेती बाब ठरत असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन सब व्हेरिएंट अमरावती शहरात आढळले असल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरची चिंता कायम आहे. बी.ए. १ आणि बी.ए. २ या दोन नवीन व्हेरिएंटची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान केंद्रातून प्राप्त जिनोम […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा रुग्ण अमरावती शहरात पहिल्यांदा सापडला होता. यानंतर सध्या संपूर्ण देशासाठी चिंतेती बाब ठरत असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन सब व्हेरिएंट अमरावती शहरात आढळले असल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरची चिंता कायम आहे. बी.ए. १ आणि बी.ए. २ या दोन नवीन व्हेरिएंटची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली आहे.
पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान केंद्रातून प्राप्त जिनोम सिक्वेनसिंगच्या १८ नमुन्यांपैकी २ ओमिक्रॉन व ११ नमुन्यांमध्ये मध्ये बी ए वन व ५ नमुन्यांमध्ये मध्ये बी ए टू हे सबव्हेरियंट आढळल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोना विषाणूची जनुकीय रचना सतत बदलत राहते त्यामुळे तीन लाटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे. आता कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल होऊन ओमिक्रॉनचा व्हेरीएंट तयार झाला आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. अमरावती जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासूनच तिसरा लाटेची सुरुवात झाली आहे. यामध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांचे व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने व्होल जीनोम स्क्विेन्सिंग साठी पुणे व दिल्ली येथे पाठवण्यात येत आहेत.
पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावं-राजेश टोपे
आतापर्यंत २१ नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनची नोंद झाल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेचे समन्वयक डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी दिली आहे. पुण्याला जिनोम सिक्वेन्स करिता पाठविण्यात आलेल्या १८ पैकी १६ नमुन्यांत ओमिक्रॉनच्या दोन प्रकारांची नोंद झाली आहे. याशिवाय आणखी ४५ नमुने तपासणीला पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात अमरावतीत आरोग्य यंत्रणांना आणखीन दक्ष रहावं लागणार आहे.