पुण्यात पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय लष्करी जवानाची आत्महत्या
पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय लष्करी जवानाने आत्महत्या केली आहे. गोरख नानाभाऊ शेलार असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. भारतीय लष्करात नर्सिंग अस्टिस्टंट पदावर हा जवान कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी या जवानाने एक व्हीडिओ तयार केला होता आणि एक सुसाईड नोटही लिहिली होती. पोलिसांकडून हे सगळं जप्त करण्यात आलं आहे. सुसाईड नोट आणि व्हीडिओच्या आधारे […]
ADVERTISEMENT

पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय लष्करी जवानाने आत्महत्या केली आहे. गोरख नानाभाऊ शेलार असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. भारतीय लष्करात नर्सिंग अस्टिस्टंट पदावर हा जवान कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी या जवानाने एक व्हीडिओ तयार केला होता आणि एक सुसाईड नोटही लिहिली होती. पोलिसांकडून हे सगळं जप्त करण्यात आलं आहे. सुसाईड नोट आणि व्हीडिओच्या आधारे पोलिसांनी जवानाची पत्नी आणि सासरच्या मंडळींच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बारामती: महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या
या प्रकरणी पोलिसांनी जवानाची पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगिता युवराज पाटील योगेश पाटील, भाग्यश्री पाटील या सगळ्यांच्या विरोधात वानवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव पाटील यांनी यासंदर्भातली तक्रार दिली आहे. वानवाडी पोलीस आता या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत त्यानंतरच अटकेची कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
केशव पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली असून त्यांनी यामध्ये म्हटलं आहे की १६ फेब्रुवारी 2021 ते 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत माझ्या भावाच्या पत्नीने म्हणजेच अश्विनीने त्याला मानसिक त्रास दिला. अश्विनीच्या माहेरचे लोक देखील गोरखला त्रास देत होते. घटस्फोट दे आणि 15 लाख रूपये दे असा तगादा त्याच्यामागे लावला जात होता. सततच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या तक्रारीत जवानाच्या भावाने हा आरोप केला आहे.










