INS Ranvir explosion : मुंबईत आयएनएस रणवीर युद्ध नौकेवर स्फोट, तीन जवान शहीद

Indian navy INS Ranvir explosion : मुंबईतील नौदलाच्या डॉकयॉर्डमध्ये असलेल्या आयएनएस रणवीर युद्धनौकेवर मंगळवारी घडली दुर्घटना...
INS Ranvir explosion : मुंबईत आयएनएस रणवीर युद्ध नौकेवर स्फोट, तीन जवान शहीद
आयएनएस रणवीर युद्ध नौकेचं संग्रहित छायाचित्रIndia Today

मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये असलेल्या आयएनएस रणवीर युद्ध नौकेवर दुर्घटना घडली. आयएनएस रणवीर झालेल्या स्फोटात तीन तीन जवान शहीद झाले आहेत. मंगळवारी (१८ जानेवारी) ही घटना घडली असून, नौदलाकडून या घटनेबद्दल माहिती देण्यात आली आहे.

युद्ध नौका आयएनएस रणवीरवर मंगळवारी सायंकाळी स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. आयएनएस रणवीरच्या एका कंपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या स्फोटात नौदलातील तीन जवानांचा मृत्यू झाला असून, काही जवान जखमी झाले आहेत. भारतीय नौदलाकडून या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

आयएनएस रणवीर ही युद्धनौका नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडमधून क्रॉस कोस्ट ऑपरेशनसाठी इथे तैनात केलेली होती आणि लवकरच ही नौका आपल्या तळावर परत जाणार होती.

याचदरम्यान हा स्फोट झाल्याची घटना घडली. नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार युद्ध नौकेवर स्फोट झाल्यानंतर युद्धनौकेवरील क्रू मेबर्संनी तातडीने बचाव कार्य हाती घेतलं. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात जवानांना यश आलं.

या स्फोटात जास्त नुकसान झालं नसल्याची माहिती असून, आयएनएस रणवीर युद्ध नौकेवर स्फोट कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

आयएनएस रणवीर युद्धनौकेबद्दल...

आयएनएस रणवीर ही एक युद्धनौका असून, भारतीय नौदलातील राजपूत श्रेणीतील ५ विनाशक युद्धनौकापैकी चौथी नौका आहे. ऑक्टोबर १९८६ मध्ये ही युद्धनौका नौदलामध्ये दाखल झाली होती. आयएनएस रणवीर युद्धनौका ३० अधिकारी आणि ३१० नाविकांच्या एका दलाद्वारे संचलित केली जाते.

Related Stories

No stories found.