दुबईहून आलेल्या मुंबईकरांना सात दिवस होम क्वारंटाईन सक्तीचं! वाचा सविस्तर काय आहेत गाईडलाईन्स?

वाचा काय आहेत मुंबई महापालिकेने दिलेल्या गाईडलाईन्स
Omicron Variant : परदेशातून परतणारे नागरिक. (प्रातिनिधीक छायाचित्र)
Omicron Variant : परदेशातून परतणारे नागरिक. (प्रातिनिधीक छायाचित्र)

दुबईहून मुंबईला येणाऱ्या मुंबईकरांना सात दिवस होम क्वारंटाईन रहावं लागणार आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण वाढत असल्याने मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. ओमिक्रॉनचा फैलाव आणखी वाढू नये म्हणून आता खबरदारीचे उपाय योजण्यात येत आहेत. आजच मुंबई महापालिकेने यासंदर्भातल्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. ज्या तातडीने अंमलात आणल्या जाव्यात असेही आदेश देण्यात आले आहे.

दुबईमधून मुंबईत येणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी या गाईडलाईन्स आहेत. जे प्रवासी मुंबईचे नाहीत मात्र महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये राहातत त्यांना त्या ठिकाणी जाता येईल मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना सार्वजनिक वाहतूक वापरता येणार नाही. तसंच त्यांनाही होम क्वारंटाईन रहावं लागणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.Omicron Variant/India today

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जगातले 12 देश हे हाय रिस्कमधले आहेत आहेत असं भारत सरकारने स्पष्ट केलं आहे. ज्यामध्ये जर्मनी, अफ्रिका, युकेमधी देश यांचा समावेश आहे. दुबई हे प्रवाशांचं एक मोठं केंद्र आहे कारण बरीच विमानं इतर देशातून आधी दुबईला आणि मग मुंबईला येतात. त्यामुळे मुंबई महापालिकेने या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या तातडीने अंमलात आणल्या जाव्यात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Omicron Variant : परदेशातून परतणारे नागरिक. (प्रातिनिधीक छायाचित्र)
महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार का? नेमकं काय म्हणाले अजित पवार?

काय आहेत मुंबई महापालिकेच्या गाईडलाईन्स?

जे प्रवासी दुबईहून मुंबईत येतील आणि ते जर मुंबईचे रहिवासी असतील तर त्यांना सात दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे. हे क्वारंटाईन राहणं सक्तीचं असणार आहे यात कोणतीही सूट कुणालाही दिली जाणार नाही.

प्रवाशांनी येताना आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही

जे प्रवासी दुबईहून मुंबईत आले आहेत आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधले रहिवासी आहेत अशा प्रवाशांची माहिती त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला दिली जाईल. त्यानंतर त्यांच्यासाठी प्रवासाची वेगळी व्यवस्था केली जाईल. या प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक वापरून प्रवास करता येणार नाही.

दुबईहून मुंबईत येणाऱ्या ज्या प्रवाशांना इतर राज्यांमध्ये जायचं आहे किंवा महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये फ्लाईटने जायचं आहे ते तसा विमान प्रवास करू शकतात. अशा स्थितीत एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सदर प्रवाशांची माहिती तेथील राज्याला, शहराला कळवणं आवश्यक आहे.

जे प्रवासी दुबईहून मुंबईत येणार आहेत आणि ते जर मुंबईकर असतील तर त्यांना वॉर्ड वॉर रूमच्या नियमांप्रमाणे मध्ये सात दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. सातव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येईल. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केलं जाईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in