पूजा चव्हाण प्रकरणातले 7 प्रश्न, उत्तरं अद्यापही मिळाली नाहीत!
पुण्यामध्ये 22 वर्षाची पूजा चव्हाणने रविवारी 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 च्या सुमारास पहिल्या मजल्यावरुन उडी मारली आणि आत्महत्या केली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच पूजाचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. पूजाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आणि प्रेमसंबंधातूनच पूजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा […]
ADVERTISEMENT

पुण्यामध्ये 22 वर्षाची पूजा चव्हाणने रविवारी 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 च्या सुमारास पहिल्या मजल्यावरुन उडी मारली आणि आत्महत्या केली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच पूजाचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. पूजाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आणि प्रेमसंबंधातूनच पूजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही.
पूजाच्या आत्महत्येनंतर आता अनेक प्रश्न निर्माण होत असून एकूण या आत्महत्या प्रकरणाबद्दल अनेक अंदाज व्य़क्त केले जात आहेत.
1. पूजा चव्हाणच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकी काय माहिती?
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर तिचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला असून या अहवालानुसार पूजाचा मृत्यू हा डोक्याला मार लागल्यामुळे तसेच पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळते. पूजा प्रेग्नंट होती, तिने मद्य प्राशन केले होते अशी चर्चा सुरु होती पण अशी कुठलीही माहीती पूजाच्या अधिकृत शवविच्छेदन अहवालात नाही. तसंच तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे त्याची अहवाल येणे अद्याप बाकी आहे. कदाचित व्हिसेरामधून अन्य काही बाबींचा उलगडा होऊ शकतो.