मुंबई तक: वर्ध्यात हिंगणघाटमध्ये एकाच हॉस्टेलमधील 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमरावती आणि अकोल्यातही अकोल्यामध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतरही फ्रंट लाईन वर्कर्सनाही कोरोना झाला आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात सुमारे ३२५० रुग्ण आढळले होते.
वर्ध्याच्या हिंगणघामधील एका शाळेच्या हॉस्टेलमधील तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोना झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं वय 10 ते 16 हॉस्टेलमधील काही विद्यार्थ्यांना सर्दी-ताप आला होता. त्याच्या उपचारासाठी ते हिंगणघाट उप जिल्हा रुग्णालयात गेले. तिथे त्यांची अँटीजन टेस्ट कऱण्यात आली. सुरुवातीला 39 विद्यार्थ्याची टेस्ट करण्यात आली त्यापैकी 30 जणांना संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थ्याला सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आलं होतं. तर, 29 विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवलं होतं. एकाच हॉस्टेलमधले इतके विद्यार्थी एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळल्यानं आता आरोग्य विभागातर्फे या हॉस्टेलमधील 250 विद्यार्थी 20 कर्माचऱ्यांची कोरोना टेस्ट करणार आहे. हे सर्व विद्यार्थी एका खासगी शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिचिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे अमरावतीमध्ये एकाच दिवशी 359 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने भीतीचं वातावरण आहे. यामध्ये कोरोना रुग्णांसाठी काम कऱणाऱ्या फ्रंट लाईन वर्कर्स आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना कोरोना झाला आहे. कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले आहे. जिल्ह्यात 16 जानेवारीपासून फ्रंट लाईन वर्कर्सना वॅक्सिन देण्यात आलं. त्यापैकीच काही जणांना कोरोना झाल्याचे समोर आल्यानने आरोग्य कर्माचऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
दरम्यान अकोला जिल्ह्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे हे नियम सक्तीचे करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने मास्क न लावणाऱ्या वाहनाचालकांवर कारावाई करायला सुरुवात केली आहे. काल दिवसभरात राज्यात ३२९७ कोरोनाचे रुग्ण आढळले होते.