चिंताजनक, राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना Corona ची लागण - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / चिंताजनक, राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना Corona ची लागण
बातम्या

चिंताजनक, राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना Corona ची लागण

मुंबई: राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 24 तासात दहा हजारांच्या जवळपास रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. राज्यात मागील काही दिवसापासून दररोज 10 हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. ज्यामुळे आरोग्य सेवेवरील ताण सातत्याने वाढत आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे मागील गेल्या 24 तासात राज्यात 12,182 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (9 march 2021 found 9927 new corona positive patients in the maharashtra)

आज दिवसभरात कोरोनाचे 56 रुग्ण दगावले असल्याची माहिती देखील मिळते आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना मृतांचा आकडा हा 52556 एवढा झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.35 टक्के एवढा आहे. तर राज्यात आताच्या घडीला 95,332 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona रूग्ण वाढल्याने जळगावात ११ ते १५ मार्च जनता कर्फ्यू

आज राज्यात 12,182 कोरोना रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 20,89,294 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 93.34 टक्के इतका आहे.

आज मुंबईत 1012 रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात 1494 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर नागपूरमध्ये 1292 आणि अमरावतीमध्ये 448 नवे रुग्ण सापडले आहेत.

  • राज्यात आतापर्यंत 22,38,398 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • त्यापैकी 20,89,294 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  • राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 52556 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • सध्या राज्यात 95,332 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,70,22,315 नमुन्यांपैकी 22,38,398 (13.15 टक्के ) नुमने हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,57,962 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,827 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत पुन्हा Lockdown लागणार का? पालकमंत्र्यांनी दिलं हे उत्तर

दरम्यान, मुंबईत लॉकडाऊनची आवश्यकता भासली तर लॉकडाऊन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भातला अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. मुंबईत कोरोना रूग्ण वाढत आहेत. इतर ठिकाणीही वाढत आहेत. अशात नाईट क्लब सर्वात आधी बंद करण्यात येतील अशी शक्यता आहे. अधिवेशन झाल्यानंतर मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया, चौपाटी या ठिकाणी रात्री जी विनाकारण गर्दी होते तिथे बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल. नाईट कर्फ्यू लावायचा की लॉकडाऊन करायचा याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 5 =

भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त ‘माही भाई तुमच्यासाठी काहीपण..’ जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं ट्विट! CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी! नाच रे मोरा… बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का? IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं! Virgin Mojito चे नाव ‘व्हर्जिन’ का? ‘ही’ आहे त्यामागची कहाणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण… IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल! Kriti Sanon: सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात ‘या’ चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या Paresh Rawal : बॉसच्या मुलीवरच जडला जीव, 12 वर्ष डेटिंग नंतर…; अभिनेत्याची भन्नाट लव्हस्टोरी ‘वीर सावरकरां’च्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं 26 किलो वजन, केलं कडक डाएट! आमिर खानच्या मुलीचा रिक्षातून प्रवास, साधेपणा दाखवूनही ट्रोल बिकिनीवरून टोकलं, नोकरी सोडून बनली अडल्ट मॉडेल अल्पवयीन साक्षीच्या डोक्याचा चेंदामेंदा करणारा नराधम बॉयफ्रेंड सापडला! Karishma Kappor चा फिटनेस फ्रिक डाएट, 48 व्या वर्षीही कमालीची फिगर कधी अंबानी कुटुंब, तर कधी बॉलिवूड स्टार्ससोबत; सगळीकडे दिसणारा ‘ओरी’ कोण? महिलेने सांगितले श्रीमंत पतीचे तोटे; यूजर्स म्हणाले, ‘जास्त पैसे असतील तर..’