मुंब्र्यात या कारणासाठी प्रियकराने गरोदर प्रेयसीची केली हत्या; पोलिसांनी दोन दिवसात लावला छडा

पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून त्यात धक्कादायक माहिती समोर आली.
मुंब्र्यात या कारणासाठी प्रियकराने गरोदर प्रेयसीची केली हत्या; पोलिसांनी दोन दिवसात लावला छडा

मुंब्रा येथील खदानीत शनिवारी एका मुलीचं मृतदेह सापडलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून त्यात धक्कादायक माहिती समोर आली. 27 वर्षीय प्रियकरानेच आपल्या गरोदर असलेल्या 22 वर्षीय प्रेयसीचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी ठाण्यातून आरोपी अल्तमश दळव. याला अटक केली आहे. मृत मुलगी गरोदर होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिलीय. मात्र याबाबत पोस्टमार्टमची रिपोर्ट आल्यानंतर खुलासा होईल.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंब्रा येथील अल्तमश हा एका लहान कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. मागील तीन वर्षांपासून एका 22 वर्षीय तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. त्याची प्रेयसी त्याच्यापासून गरोदर होती आणि त्याला लग्नासाठी सांगत होती. मात्र अल्तमशचं लग्न दुसऱ्याच मुलीसोबत जमलं होतं. याबाबत त्याच्या प्रेयसीला कळालं. त्यामुळे प्रेयसी आणि तिच्या बहिणीने अल्मतशच्या घरी सगळं सांगून टाकलं. म्हणून अल्तमश तिच्यावर रागावलेला होता, अशी माहिती मृत तरुणीच्या बहिणीने दिली.

असा काढला प्रेयसीचा काटा

लग्नासाठी तगादा लावत असल्याने आणि घरी सांगितल्याचा राग अल्तमशला होता. त्यामुळे त्याने तिला मुंब्रा बायपासच्या खदानीजवळ आपल्या मोटारसायकलने नेलं. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यावर धारधार शास्त्राने वार केला. गळ्यावर सुऱ्याने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. झुडपात तिचा मृतदेह फेकून तो तिथून पसार झाला.

शनिवारी पोलिसांना मुंब्र्याच्या डोंगराळ भागात मृतदेह असल्याचा फोन आला. पोलिसांची आणि फॉरेन्सिकची एक टीम तात्काळ तिथे दाखल झाली. पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवले. पुढील दोन तासात पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले. मृत मुलीच्या कुटुंबियांकडून अधिक माहिती घेतली असता त्यांना तिचा प्रियकर अल्तमश याच्यावर संशय असल्याचं पोलिसांना सांगितलं. माहिती मिळताच पोलिसांनी ठाण्यातून प्रियकर अल्तमश याला अटक केली. आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता त्याला 17 ऑगस्टपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in