बॉयफ्रेंड अन् प्रेयसीचे बाथरुममध्ये शरीरसंबंध, मुलगी बेशुद्ध पडली, रक्तस्त्राव सुरू अन्...
Crime News : पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना एका वॉशरूममध्ये घडली. याच ठिकाणी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. या दरम्यान तरुणी अचानक बेशुद्ध पडली आणि तिला प्रचंड रक्तस्राव सुरू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बॉयफ्रेंड अन् प्रेयसीचे बाथरुममध्ये शरीरसंबंध
रक्तस्त्राव होऊन मुलीचा जागेवर मृत्यू, मुलीच्या वडिलांचे गंभीर आरोप
Crime News : तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील मंडल परिसरात एका 22 वर्षीय तरुणीच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ती मृत्यूमुखी पडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणात विवेक नावाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. विवेक हा मृत तरुणीचा प्रियकर असल्याचेही तपासात समोर आले आहे. ही धक्कादायक घटना 17 डिसेंबरच्या रात्री घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विवेकने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले होते. दोघांमध्ये आधीपासून ओळख आणि प्रेमसंबंध असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, या भेटीचा शेवट एका भीषण घटनेत झाला.
वॉशरूममध्ये घडली घटना
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना एका वॉशरूममध्ये घडली. याच ठिकाणी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. या दरम्यान तरुणी अचानक बेशुद्ध पडली आणि तिला प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. परिस्थिती गंभीर झाल्याचे लक्षात येताच आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या काही जणांनी तरुणीला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तरुणीचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विवेकविरोधात भारतीय दंड संहितेतील गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, यासोबतच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (SC/ST Act) तरतुदीही लावण्यात आल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात अजूनही अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले जात असून, घाईघाईत कोणतेही निष्कर्ष काढले जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असून, काही जण या घटनेचा संबंध राजकीय कार्यक्रम किंवा निवडणुकीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महबूबनगर पोलिसांनी या सर्व दाव्यांचे खंडन केले आहे. पोलिसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या घटनेचा कोणत्याही राजकीय कार्यक्रमाशी किंवा निवडणूक प्रक्रियेशी काहीही संबंध नाही. अप्रामाणिक माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी संयम बाळगावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.










