कथा खाकी वर्दीतल्या माणुसकीची, संवेदनशील अधिकाऱ्याची!
कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते, कोण म्हणतं तो भावनाशून्य असतो? खाकीतला पोलीसही एक माणूसच असतो. सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही भावना असतात आणि त्याच्याही मनाचा एक कोपरा हळवा असतो. प्रत्येक वेळी गुन्हेगारांना वठणीवर आणणारे आक्रमक पोलीस आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पण याच पोलीस दादांनी केलेल्या सामाजिक कामामुळे देखील खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडते. असाच काहीसा प्रकार […]
ADVERTISEMENT

कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते, कोण म्हणतं तो भावनाशून्य असतो? खाकीतला पोलीसही एक माणूसच असतो. सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही भावना असतात आणि त्याच्याही मनाचा एक कोपरा हळवा असतो. प्रत्येक वेळी गुन्हेगारांना वठणीवर आणणारे आक्रमक पोलीस आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पण याच पोलीस दादांनी केलेल्या सामाजिक कामामुळे देखील खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडते. असाच काहीसा प्रकार बारामती शहर पोलिसांनी केलेल्या कामातून पहायला मिळाला. ज्याची चर्चा सध्या संपूर्ण शहरात सुरु आहे.
त्याच झाल असं की, बारामती तालुक्यातल्या माळेगाव बुद्रुक येथील दिव्यांग व्यक्ती मधुकर वाईकर हे गेली अनेक वर्षांपासून पल्स पोलिओ अभियानाच्या प्रसारासाठी तीन चाकी सायकलवरून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. याच कामासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी बारामती शहरातल्या एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन तीन चाकी एक बाइक घेतली होती. त्यावरुन प्रवास करत ते पोलिओ अभियानापासून स्वच्छता मोहीम, तंटामुक्ती अभियान, लसीकरण मोहीम यासारख्या अनेक सामाजिक कामांसाठी ते प्रचार करायचे. पण या कामातून त्यांना पुरेसे पैसे मिळत नसायचे, मिळायची फक्त शाबासकीची थाप.
दरम्यान, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे वाईकर यांना देखील काम मिळेनासं झालं. लॉकडाउनच्या काळात त्यांना आपल्या बाइकच्या कर्जासाठी सवलत मिळाली. पण लॉकडाउन संपताच पुन्हा एकदा वाईकर यांच्यामागे फायनान्स कंपनीने कर्जासाठी तगादा लावला.