अभिनेता अतुल कुलकर्णीचं एकच वाक्य.. नेटकरी म्हणाले ‘सॉलिड’
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी कंगना रणौतच्या वक्तव्याचं समर्थन केलं. स्वातंत्र्य ही आपल्याला मिळालेली भीकच आहे हे कंगनाचं म्हणणं बरोबर आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. आज शरद पवार यांनीही विकृत लोकांबाबत काही भाष्य करणार नाही असं म्हटलं आहे. दुसरीकडे अभिनेता अतुल कुलकर्णीने ट्विट केलेलं एक वाक्य नेटकऱ्यांच्या […]
ADVERTISEMENT

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी कंगना रणौतच्या वक्तव्याचं समर्थन केलं. स्वातंत्र्य ही आपल्याला मिळालेली भीकच आहे हे कंगनाचं म्हणणं बरोबर आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. आज शरद पवार यांनीही विकृत लोकांबाबत काही भाष्य करणार नाही असं म्हटलं आहे. दुसरीकडे अभिनेता अतुल कुलकर्णीने ट्विट केलेलं एक वाक्य नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे.
काय म्हणाले होते विक्रम गोखले?
आज मराठी माणूस भरडला जातो आहे. सध्याचं महाविकास आघाडी सरकार हे चुकलेलं गणित आहे, हे गणित सुधारण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर आहे, अशात भाजप आणि शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. कंगनाने देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं असं वक्तव्य केलं ते योग्यच आहे. देशासाठी लढणारे लोक फासावर जात होते त्यावेळी आपले लोक बघत बसले होते असं विक्रम गोखलेंनी म्हटलं आहे.
अतुल कुलकर्णी यांनी एका ओळीचं ट्विट केलं आहे