अकोला : अल्पवयीन मुलीसोबत मौलानाचे दुष्कर्म, पोलिसांनी केली अटक

पीडित मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल
अकोला : अल्पवयीन मुलीसोबत मौलानाचे दुष्कर्म, पोलिसांनी केली अटक
आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे

अकोल्याच्या जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्वयंघोषित मौलानाने शाररिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मदरशामधील मौलाना मोहम्मद रिझवान अब्दुल शकुर याला अटक केली आहे.

पोलिसांनी २७ वर्षीय मौलानाविरुद्ध POSCO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी पीडित मुलगी आरोपीच्या दळण केंद्रावर गेली असता आरोपीने या मुलीसोबत संवाद साधायला सुरुवात केली.

तू कोणत्या मदरशात शिकतेस असा प्रश्न विचारुन आरोपीने पीडित मुलीसोबत शाररिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतू यावेळी पीडित मुलीने जोरात आरडाओरड करत थेट आपलं घर गाठलं आणि आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. आई-वडिलांनी यानंतर अकोला जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in