अग्निपथ योजनेविरोधात उफाळला रोष! केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई तक

अग्निपथ या सरकारच्या योजनेला जाहीर झाल्यापासूनच विरोध होतो आहे. योजनेविरोधात चांगलाच रोषही दिसून येतो आहे. अनेक राज्यांमधले विद्यार्थी या योजनेविरोधात आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. यानंतर आता मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी वय वर्षे २१ पर्यंतचीच वयोमर्यादा होती. ती आता केंद्र सरकारने वाढवली आहे. रस्त्यावर उतरून सरकार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अग्निपथ या सरकारच्या योजनेला जाहीर झाल्यापासूनच विरोध होतो आहे. योजनेविरोधात चांगलाच रोषही दिसून येतो आहे. अनेक राज्यांमधले विद्यार्थी या योजनेविरोधात आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. यानंतर आता मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी वय वर्षे २१ पर्यंतचीच वयोमर्यादा होती. ती आता केंद्र सरकारने वाढवली आहे.

रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोष शांत करण्यासाठी सरकारने आता या योजनेतली वयोमर्यादा २१ वरून २३ केली आहे. केंद्र सरकारने अग्निपथ योजनेतील वयोमर्यादेत बद केला आहे. संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात जारी केलेल्या निवदेनात म्हटलं आहे की अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरतीसाठी कमाल वयोमर्यादा २१ वरून २३ करण्यात आली आहे. २०२२ साठीच्या भरती प्रक्रियेतच हे लागू होईल असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सरकारने?

अग्निपथ योजनेतील प्रवेश वयोमर्यादेचा विस्तार करण्यासंदर्भात सरकारने 2022 साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयामध्ये एक वेळ सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2022 अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे. हे सरकारने स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp