अनिल देशमुखांना वीज खातं कधीच समजणार नाही-बावनकुळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आपल्याला वीज खातं कधीच समजणार नाही. आपणास हे माहित असलं पाहिजे की इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आणि डिव्हाइसवर सायबर हल्ले होतात. कंडक्टरवर म्हणजेच वायरवर नाही. सायबर हल्ल्यामुळे मुंबईतली बत्ती गुल झाली नव्हती, ती वायर तुटल्यामुळे झाली होती असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुखांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मुंबईतली वीज गेली होती तो तांत्रिक विषय आहे त्याबाबत बोलून चंद्रशेख बावनकुळे यांनी स्वतःचं हसं करून घेऊ नये असा उपरोधिक सल्ला अनिल देशमुख यांनी दिला होता. त्यांच्या याच ट्विटला आता चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणालेत चंद्रशेखर बावनकुळे?

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्याबद्दल ट्विट करून आपल्याला तांत्रिक बाबी समजणार नाही आपण आपले हसू करून घेऊ नका असं म्हटलं आहे. माननीय अनिल देशमुखजी आपल्याला वीज खातं कधीच समजणार नाही. १२ ऑक्टोबरला झालेली घटना ही कोणत्याही सायबर अटॅकमुळे झालेली नाही. १० ऑक्टोबरपासून ४०० केव्हीच्या दोन लाईन ब्रेक डाऊन मधे गेल्या होत्या. त्याचा लोड तिसऱ्या आणि चौथ्या लाईनवर आलं होतं. तिसरी लाईनही गेली, चौथी लाईन जाणार होती तेव्हा ती आपल्या ऑपरेटरने ती बंद केली आहे. १२ तारखेला जे काही झालं त्यामागे अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा होता. १२ कोटी जनतेला तुम्ही मूर्ख बनवू नका. सायबर हल्ल्यामुळे वायर तुटत नाही. त्यामुळे या विषयावर बोलू नका.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काल नेमकं काय म्हणाले होते अनिल देशमुख?

न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक बातमी आली आहे. त्यामध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे की मुंबईत जी बत्ती गुल झाली त्यामागे चीनचा होता अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. १२ ऑक्टोबरला मुंबईत अनेक ठिकाणी लाईट गेली होती. त्यावेळी उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही अशी मागणी केली होती की यामागे काही परकीय शक्ती आहे का याची चौकशी करण्यात यावी याची मागणी केली होती. त्यानंतर आम्ही हे सगळं प्रकरण सायबर सेलकडे सोपवलं होतं. त्यानंतर असं समोर आलं आहे की मुंबईच्या वीज वितरण यंत्रणेत काही व्हायरस सोडण्याचा प्रयत्न झाला अशी शक्यता सरकारकडे आलेल्या अहवालात वर्तवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT