विलीनीकरणाची मागणी रास्त म्हणणाऱ्या शिवसेना आमदाराचं घुमजाव, म्हणाले…
महाविकास आघाडीतली धुसफूस आणि एसटी कामगारांच्या संपावरुन सरकारला घरचा आहेर देणाऱ्या दोन शिवसेना आमदारांनी २४ तासांच आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केलं आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनीही यु-टर्न घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एसटी कामगारांची विलीनीकरणाची मागणी रास्तच असल्याचं म्हणत कामगारांना पाठींबा देणारं आमदार संतोष बांगरं यांचं पत्र […]
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीतली धुसफूस आणि एसटी कामगारांच्या संपावरुन सरकारला घरचा आहेर देणाऱ्या दोन शिवसेना आमदारांनी २४ तासांच आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केलं आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनीही यु-टर्न घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी एसटी कामगारांची विलीनीकरणाची मागणी रास्तच असल्याचं म्हणत कामगारांना पाठींबा देणारं आमदार संतोष बांगरं यांचं पत्र सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झालं होतं.
२४ तासात शहाजीबापूंचा यु-टर्न, म्हणाले मरेपर्यंत मी शिवसेनेतच राहणार!
परंतू प्रसारमाध्यमांवर बातम्या आल्यानंतर संतोष बांगर यांनी हे पत्र आपल दिलंच नसल्याचा दावा केला आहे. एसटी कामगारांच्या संपाला पाठींबा देणारं पत्र हे संतोष बांगर यांच्या सहीनिशी व्हायरल झालं होतं. यावरुन शिवसेना आमदारानेच सरकारला घरचा आहेर दिल्याचीही चर्चा रंगली होती. परंतू एका रुग्णाला मदत व्हावी यासाठी शिफारसीकरता दिलेल्या माझ्या कोऱ्या पत्राचा गैरवापर झाल्याचं बांगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.