अॅपल चीनला धक्का देऊ शकतो ज्यामुळे याचा भारताला खूप फायदा होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार Apple iPhones नंतर आता iPad चे उत्पादन भारतात शिफ्ट केले जाऊ शकते. जरी, संपूर्ण उत्पादन स्थलांतरित केले जाणार नाही, परंतु कंपनी चीनमधून 30 टक्के उत्पादन काढून टाकू शकते, अशी माहिती मिळत आहे.
सीएनबीसीच्या एका रिपोर्टमध्ये याबाबतचा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की अॅपल आयपॅडचे काही उत्पादन चीनमधून भारतात हलवून नवीन पर्याय शोधू इच्छित आहे. या अहवालात भारत सरकारच्या दोन सूत्रांचा हवाला देण्यात आला आहे. मात्र, कंपनीने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
अलीकडे, Apple ने घोषणा केली की ते चेन्नईतील Foxconn च्या श्रीपेरुम्बुदुर सुविधेमध्ये नवीन लाँच केलेला iPhone 14 तयार करेल. अधिकृत निवेदनात माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, ती भारतात आयफोन 14 च्या निर्मितीबद्दल खूप उत्साहित आहे.
कंपनीने पुढे सांगितले की नवीन आयफोन 14 लाइनअपमध्ये नवीन ग्राउंडब्रेकिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हे सुरक्षा क्षमतेसह येते. फक्त फॉक्सकॉन भारतात आयफोन 14 तयार करत नाही. अलीकडेच Pegratron ने डिव्हाइस असेंबल करण्यास सुरुवात केली आहे.
Apple भारतात आधीच अनेक आयफोन बनवत आहे. iPhone 12, 13 आणि iPhone SE भारतात तयार केले जातात. पण, चीनमध्ये कोरोना बंदीमुळे iPhone 14 Pro मॉडेलच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. रिपोर्टनुसार, चीनच्या झेंगझोऊ येथे असलेल्या फॉक्सकॉन प्लांटमधून 20 हजार कामगारांनी राजीनामा दिला आहे. येथील कामकाजाच्या स्थितीवर नाराज कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, त्याला नंतर हिंसक वळण लागले. आता या सर्व बाबी पाहता कंपनी उत्पादन स्थलांतरित करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे याचे उत्पादन भारतात येऊ शकते. ज्यामुळे याचा मोठा फायदा भारताला होईल. त्याचबरोबर मोठ्याप्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होऊ शकतो.