समीर वानखेडे चारी बाजूने अडकले?, NCB टीमच्या आधी मुंबई पोलिसांनी सुरु केला ‘त्या डील’चा तपास
Sameer Wankhede Case: मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणादरम्यान एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे देखील आता अडचणीत सापडू लागले आहेत. या संपूर्ण प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर सईल यांने आर्यन खानला सोडवण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या खंडणीचा गंभीर आरोप केला आहे. याच आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीचे पाच सदस्यीय पथक काही वेळात मुंबईत पोहोचणार आहे. मात्र त्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी […]
ADVERTISEMENT

Sameer Wankhede Case: मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणादरम्यान एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे देखील आता अडचणीत सापडू लागले आहेत. या संपूर्ण प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर सईल यांने आर्यन खानला सोडवण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या खंडणीचा गंभीर आरोप केला आहे. याच आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीचे पाच सदस्यीय पथक काही वेळात मुंबईत पोहोचणार आहे. मात्र त्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे.
प्रभाकर सईलच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे आणि इतरांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी रात्री प्रभाकरचा जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आला आहे. डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याने प्रभाकरचे म्हणणे घेतले असून, त्यानंतर तपास सुरू केला आहे. पोलिस आधी इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रभाकर सईल याने आपल्या आरोपांमध्ये ज्या लोकांची नावे दिली आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. याशिवाय प्रभाकरच्या फोनचे लोकेशनही तपासले जात आहे. प्रभाकरने ज्या ठिकाणी पैशाच्या व्यवहाराचा दावा केला आहे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन केले जाणार आहे. या सर्व प्राथमिक तपासानंतर अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर एफआयआर नोंदवायचा की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
किरण गोसावीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला समीर वानखेडेच्या सांगण्यावरून 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप प्रभाकरने केला आहे. यामध्ये काही रकमेचा व्यवहारही झाला होता. याच आरोपांची आता चौकशी सुरू आहे.