कल्याण हादरलं! सार्वजनिक शौचालयात रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

मुंबई तक

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र आहे. कल्याणामध्येही गुन्हेगारीच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच आता आणखी एक खळबळजनक हत्येची घटना उजेडात आली आहे. सार्वजनिक शौचालयात एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. रिक्षाचालकाची सार्वजनिक शौचालयात अज्ञात व्यक्तींकडून त्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र आहे. कल्याणामध्येही गुन्हेगारीच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच आता आणखी एक खळबळजनक हत्येची घटना उजेडात आली आहे. सार्वजनिक शौचालयात एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

रिक्षाचालकाची सार्वजनिक शौचालयात अज्ञात व्यक्तींकडून त्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील उंबर्डे गावात घडली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अभिमान भंडारी (51) असे मृतक रिक्षाचालकाचे नाव आहे.

धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना पती-पत्नी गेले गाडी खाली; कल्याण स्थानकावरील थरार

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात रिक्षाचालक अभिमान भंडारी हे कुटुंबासह राहत होते. भंडारी नेहमीप्रमाणे घराबाहेर असलेल्या गावातील सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्यावेळी कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करून तेथून पळ काढला.

अभिमान हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात येत होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अभिमान यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. आरोपीला पकण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कल्याण : Uber चालकाचं अपहरण करुन हत्या, मृतदेह कसारा घाटात फेकला

दरम्यान, ही हत्या आर्थिक वा कौटुंबिक वादातून या अशा कोणत्या कारणामुळे झाली असावी, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp