उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, 430 लोकांना सैन्यदलाने वाचवलं, 8 जणांचा मृत्यू - Mumbai Tak - avalanche in uttarakhand 430 people rescued by army 8 killed - MumbaiTAK
बातम्या

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, 430 लोकांना सैन्यदलाने वाचवलं, 8 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधल्या चामोलीत मोठी दुर्घटना घडली आहे. भारत चीन सीमेजवळ सुमना भागात ITBP च्या बटालियन पोस्टजवळ हिमस्खलन झाल. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी तातडीने बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. हिस्मस्खलन झाल्याने त्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. आत्तापर्यंत 430 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. […]

उत्तराखंडमधल्या चामोलीत मोठी दुर्घटना घडली आहे. भारत चीन सीमेजवळ सुमना भागात ITBP च्या बटालियन पोस्टजवळ हिमस्खलन झाल. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी तातडीने बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. हिस्मस्खलन झाल्याने त्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. आत्तापर्यंत 430 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर या दुर्घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. जवानांनी 430 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलं आहे.

भारतीय लष्कराने आत्तापर्यंत 430 जणांचे प्राण वाचवले आहेत. तरीही आणखी सुमारे 400 जण बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. भारतीय लष्कराचं मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हिमस्खलन हे ITBP च्या छावणीजवळ झालं नाही. आर्मी कॅम्प सुरक्षित आहे. वाचवण्यात आलेल्या 430 जणांना रेस्क्यू ऑपरेशन कॅम्पमध्ये आणण्यात आलं. त्यातले 384 लोक परतले आहेत. इतर कोण कोण बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे त्याचा शोध सुरू आहे. आत्तापर्यंत आम्हाला ८ मृतदेह सापडले आहेत. उत्तराखंडच्या डीजीपींनी ही माहिती दिली आहे.

उत्तराखंडमध्ये जे लोक हिमस्खलनामुळे अडकले त्यांना वाचवण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर्सही वापरली जात आहेत. सुमोना भागात जे हिमस्खलन झालं तिथल्या लोकांना तिथून एअर लिफ्ट केलं जातं आहे. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर आर्मी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − thirteen =

Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान! अल्लू अर्जुनने केलं मतदान, ज्युनियर NTR ने लावली रांग; तेलंगणा मतदानात स्टार पॉवर!