
ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. ज्याप्रमाणे ऑगस्टमध्ये 18 दिवस बँकेला सुट्टी होती, त्याचप्रमाणे पुढच्या महिन्यातील सुट्ट्यांची यादीही मोठी आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरमध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह बँका १३ दिवस बंद राहतील.
सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीपासून नवरात्रोत्सवापर्यंत बँकांना सुट्ट्या असतील. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसोबत रविवारची सुट्टी जोडल्यास संपूर्ण महिन्यात एकूण 13 दिवस बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढच्या महिन्यात काही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जावे लागत असेल, तर प्रथम आरबीआयची बँक हॉलिडे लिस्ट नक्कीच तपासा.
राज्य आणि शहरांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगळ्या असतात. वास्तविक, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. सणासुदीच्या महिन्यात बँकांच्या शाखा बंद असल्या तरी या काळात तुम्ही तुमचे बँकिंग संबंधित काम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करू शकता. ऑनलाइन बँकिंग सेवा सर्व दिवस उपलब्ध असेल.
1 सप्टेंबर - गणेश चतुर्थी-दुसऱ्या दिवशी (पणजी)
6 सप्टेंबर - कर्मा पूजा (रांची-झारखंड)
7 आणि 8 सप्टेंबर - ओणम (तिरुअनंतपुरम-कोच्ची)
9 सप्टेंबर - इंद्रजाता (गंगटोक)
10 सप्टेंबर- श्री नरवना गुरु जयंती (तिरुअनंतपुरम-कोच्ची) (दूसरा शनिवार)
21 सप्टेंबर - श्री नारायणा गुरु समाधि दिवस (तिरुवनंतपुरम-कोच्ची)
26 सप्टेंबर - नवरात्रि स्थापना (जयपुर-इंफाळ)
4, 11, 18 आणि 25 सप्टेंबर रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टी तर 24 सप्टेंबरला चौथ्या शनिवारची सुट्टी असेल.