पश्चिम बंगाल विधानसभेत राडा! भाजप-तृणमूल काँग्रेसचे आमदार भिडले, ५ भाजप आमदार निलंबित

मुंबई तक

पश्चिम बंगालमधील विधिमंडळ अधिवेशनाला शेवटच्या दिवशी गालबोट लागलं. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये धक्काबुक्कीची घडना घडली. या घटनेत तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजूमदार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, अखेरच्या दिवशी भाजप […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पश्चिम बंगालमधील विधिमंडळ अधिवेशनाला शेवटच्या दिवशी गालबोट लागलं. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये धक्काबुक्कीची घडना घडली. या घटनेत तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजूमदार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पश्चिम बंगाल विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, अखेरच्या दिवशी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर भाजपचे आमदार सभागृहातून बाहेर पडले.

बाहेर पडलेल्या भाजप आमदारांनी आरोप केला आहे की, बीरभूम प्रकरणावर चर्चा करावी अशी मागणी केली होती. यावरून सभागृहात गदारोळ सुरू झाला आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी धक्काबुक्की केली, असं भाजपच्या आमदारांचं म्हणणं आहे.

भाजपचे आमदार मनोज तिग्गा यांनी विधानसभेच्या बाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी ते म्हणाले, “तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी मला धक्काबुक्की केली. या गदारोळात शर्टही फाटला,” असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर भाजप आमदार आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

बीरभूम प्रकरणावरील चर्चेवरून बाचाबाची झाली. या मुद्द्यावरून भाजपचे आमदार मनोज तिग्गा आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजूमदार यांच्या झटापट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांना मारल्याची माहिती असून, या घटनेत असित मजूमदार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती आहे.

या गदारोळानंतर आमदार सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्यासह मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष, दीपक बरमन यांचा समावेश आहे. पुढील आदेश येईपर्यंत पाच आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp