UP Election result : भाजपचा उमेदवार ठरला अजित पवारांवर वरचढ, जाणून घ्या कसं?

मुंबई तक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले आहेत, ज्यात अपेक्षेप्रमाणे योगी आदित्यनाथ यांच्या भाजप सरकारने बाजी मारत सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. उत्तर प्रदेशात आज भाजपच्या विजयोत्सवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण आली आहे. नोएडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांनी ऐतिहासीक विजयाची नोंद केली. मिळालेल्या माहितीनुसार पंकज सिंह यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले आहेत, ज्यात अपेक्षेप्रमाणे योगी आदित्यनाथ यांच्या भाजप सरकारने बाजी मारत सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. उत्तर प्रदेशात आज भाजपच्या विजयोत्सवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण आली आहे. नोएडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांनी ऐतिहासीक विजयाची नोंद केली.

मिळालेल्या माहितीनुसार पंकज सिंह यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी यांचा 1 लाख 81 हजारांपेक्षा जास्त मताने पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातला हा सर्वात मोठा विजय मानला जातो आहे.

उत्तर प्रदेशात पुन्हा ‘योगीराज’, लखनऊत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

याआधी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा रेकॉर्ड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर जमा आहे. अजित पवारांच्या नावावर 1 लाख 65 हजार मताधिक्यांनी विजयाचा विक्रम जमा होता. हा विक्रम पंकज सिंह यांनी मोडला आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता पंकज सिंह यांना 2 लाख 44 हजार 91 मत मिळालेली असून सपाच्या सुनील चौधरी यांना 62 हजार 722 मतं मिळाली आहेत.