भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातात हातोडा दिला : किरीट सोमय्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राकेश गुडेकर, रत्नागिरी

खेड : एका मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा प्रतीक, महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्याचा प्रतीक बांधण्याचं काम केलं, मागच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचे संवर्धन केलं, आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भ्रष्टाचाराचं प्रतीक तोडण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं आहे, “हा हातोडा घ्या आणि ते भ्रष्टाचाराचे प्रतीक नेस्तनाबूत करण्याचं काम करा”. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने मी दापोलीला जात आहे. आजपासून अनिल परब यांचा हा बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया सुरू होणार असा दावा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक

दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा कोस्टल झोन मॉनिटरिंग कमिटी (DCZMC) यांना २५ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे माजी परिवहन मंत्री व तात्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर आले आहेत. खेड येथे त्यांचं आगमन झालं असून ते दापोलीकडे रवाना झाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हलाल विरुद्ध झटका वाद पुन्हा उफळला : राज ठाकरेंचे मनसैनिकांना नवे आदेश

मागील आठवड्यात या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी केंद्राच्या तज्ञ समितीने या रिसॉर्टवर कारवाई करून तोडण्याची शिफारस केली होती. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटला आता नंबर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पडणार असे ट्वीट सोमय्या यांनी केलं होतं. या सोबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून आलेले पत्रही ट्विट केले होते. महाराष्ट्र राज्याचे कोस्टल झोन एथॉर्टी सेक्रेटरी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला हे पत्र देण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्रालयाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना अनिल परब यांचे दापोली येथील अनधिकृत, बेकायदेशीर साई रिसॉर्ट आणि सी कोंच रिसॉर्ट पाडण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती सोमय्या यांनी ट्विट द्वारे दिली होती. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडून देण्यात आलेले पत्रही त्यांनी ट्विट केलं होतं. त्यांनतर आज किरीट सोमय्या दापोली दौऱ्यावर आले आहेत.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा हायजॅक करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खेड रेल्वे स्टेशन,भरणे नाका,दापोली शहरात दापोली- हर्णै या प्रमुख राज्य मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुरूड परिसरातही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT