हे तर सत्ताआंधळे… नवाब मलिकांच्या अटकेच्या मुद्यावरुन मुनंगटीवारांचा शिवसेनेवर निशाणा
मुंबई: ‘काही जण हे रातआंधळे असतात तसे हे सत्ताआंधळे लोक बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा एकत्रित येऊन पाठराखण करत आहेत.’ असं म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आज (25 फेब्रुवारी) महाराष्ट्र भाजपच्या कोअर टीमची एक बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी बोलताना मलिकांच्या मुद्यावरुन शिवसेनेवर […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘काही जण हे रातआंधळे असतात तसे हे सत्ताआंधळे लोक बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा एकत्रित येऊन पाठराखण करत आहेत.’ असं म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आज (25 फेब्रुवारी) महाराष्ट्र भाजपच्या कोअर टीमची एक बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी बोलताना मलिकांच्या मुद्यावरुन शिवसेनेवर बरीच टीका केली.
पाहा सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले:
‘1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडतंय की, रातआंधळे असतात तसे हे सत्ताआंधळे लोक बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा एकत्रित येऊन पाठराखण करत आहेत. संविधानातील तरतुदीचं उल्लंघन होतंय.’
‘संजय राठोडांना एक न्याय आणि देशविघातक कृत्याच्या संदर्भात जर चौकशी असेल तर विशिष्ठ धर्माचा आहे म्हणून सारंच्या सारं सरकार पाठिशी उभं राहतंय हे 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा घडतंय.’