मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्याने ही वेळ आली, OBC Reservation वरुन बावनकुळेंची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात ओबीसी आरक्षणावरुन पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पहाला मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचं खापर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर फोडलं आहे.

“संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला निवडणूका घ्याव्या लागतात, पण राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलू असं म्हणत राज्यातील ओबीसी जनतेची दिशाभूल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांझोट्या बैठका घेतल्या आणि वेळकाढूपणा केला. आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दणका दिलाय. निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ओबीसी जनतेला आता न्याय मिळेल की नाही हा प्रश्नच आहे.”

राज्य सरकारने आता तीन महिन्यांत इम्पेरिकल डेटा गोळा करुन ओबीसींना आरक्षण द्यावं. असं झालं नाही तर राज्यातील ओबीसी समाज सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही. भाजप या सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करणार आहे इशा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावर राज्य सरकार आता काय प्रतिक्रीया देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT