गोवा भाजपचे आमदार सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने पक्ष सोडत आहेत, दिनेश गुंडूराव यांचा आरोप

मुंबई तक

गोवा भाजपचे आमदार सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने पक्ष सोडत आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसचे गोवाच्या प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. एवढंच नाही तर आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही गोव्यात एकत्र येऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गोवा भाजपचे आमदार सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने पक्ष सोडत आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसचे गोवाच्या प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. एवढंच नाही तर आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही गोव्यात एकत्र येऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी दिलं उत्तर म्हणाले….

गोव्यात यावेळी चित्र काय असेल असं विचारलं असता दिनेश गुंडूराव म्हणाले की यावेळी गोव्यात त्रिशंकू विधानसभा नसणार. गेल्यावेळी जे घडलं ते यावेळी होणार नाही, त्यामुळे आम्हाला बहुमत मिळेल असा विश्वासच एकप्रकारे गुंडूराव यांनी व्यक्त केला आहे. तृणमूलसोबत तुम्ही जाणार का? असं विचारलं असता दिनेश गुंडूराव म्हणाले की आमचं राजकीय शत्रुत्व उघड आहे त्यामुळे आम्ही तृणमूलसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही.

उत्तर प्रदेशात स्वतः प्रचाराला जाणार, समाजवादीसोबत निवडणूक लढवणार-शरद पवार

तृणमूल काँग्रेसचा गोव्यात येण्याचा उद्देशच काँग्रेसला कमकुवत करणं हा आहे. आम्ही अशा पक्षासोबत हातमिळवणी कशी काय करणार? तृणमूलसोबत जायचं नाही ही आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचा, आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

गेल्या वेळच्या निवडणुकीतही आमचाच विजय झाला होता. भाजपने मागच्या दाराने येऊन सत्ता काबीज केली. आता तिथे मनोहर पर्रिकर नाहीत. ते असोत की नसोत आमचा विजय होणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे असंही गुंडूराव यांनी स्पष्ट केलं. भाजपचे आमदार पक्ष का सोडत आहेत? हे विचारलं असता ते सेक्स स्कँडल आणि नोकरी घोटाळ्यात अडकले आहते म्हणून पक्ष सोडत आहेत असा आरोप गुंडूराव यांनी केला. आता याबाबत भाजप काय उत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp