Solapur मध्ये CM Uddhav Thackeray यांचा पुतळा जाळण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न
सोलापूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी मधे हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला. पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या झटापटीत या पुतळ्याच्या चिंध्या झाल्या. पुतळा जाळण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी आधी या पुतळ्याला लाथा मारल्या. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वात सोलापूरमध्ये आंदोलन सुरू असताना […]
ADVERTISEMENT

सोलापूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी मधे हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला. पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या झटापटीत या पुतळ्याच्या चिंध्या झाल्या. पुतळा जाळण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी आधी या पुतळ्याला लाथा मारल्या. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वात सोलापूरमध्ये आंदोलन सुरू असताना ही घटना घडली.
आंदोलन करणाऱ्या भाजप आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखून पुतळा ताब्यात घेतला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये पुतळ्यावरून पकडापकडी झाली.आंदोलनकर्त्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अहमदनगरमध्येही आंदोलन