मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ, BMC कडून नागरिकांसाठी नवीन नियमावली जाहीर
शहरात मलेरियाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता मुंबई महापालिकेने नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूचा सामना करत आहे, अशा परिस्थितीत मुंबईत पावसाळ्यात नेहमी मलेरिया-डेंग्यू या आजाराचे रुग्ण वाढतात. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२१ ते […]
ADVERTISEMENT

शहरात मलेरियाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता मुंबई महापालिकेने नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूचा सामना करत आहे, अशा परिस्थितीत मुंबईत पावसाळ्यात नेहमी मलेरिया-डेंग्यू या आजाराचे रुग्ण वाढतात. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२१ ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुंबईत ३ हजार ६०६ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये मुंबईत ८४८ मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. जाणून घ्या महापालिकेने दिलेली आकडेवारी-
-
मलेरिया – ३६०६
लेप्टोस्पायरेसिस – १५१