टँकरमध्ये उकळत्या डांबराचा स्फोट होऊन भीषण आग, दोन जण ठार तिघांची प्रकृती गंभीर

अकोल्यातली धक्कादायक घटना, टँकर जळून खाक
टँकरमध्ये उकळत्या डांबराचा स्फोट होऊन भीषण आग, दोन जण ठार तिघांची प्रकृती गंभीर

अकोला नॅशनल हायवेवर काम करणाऱ्या ईगल कंस्ट्रक्शन कंपनीच्या टँकरला भीषण आग लागली. टँकरमध्ये असलेल्या उकळत्या डांबराचा स्फोट होऊन ही घटना घडली. या घटनेत दोन जण ठार झाले आहेत तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. या टँकरमध्ये केमिकल आणि डांबर होतं. मोठा आवाज होऊन स्फोट झाला आणि आग लागली.

या घटनेत दोघांचा मृत्यू घटना स्थळीच झाला. तसंच आग लागल्याने टँकर जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी पोहचले. काही तास अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांनी ही आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी आणि पोलीसही घटना स्थळी पोहचले.

या घटनेत ज्या दोघांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह आगीत जळून खाक झाले आहेत. जे तीन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर अकोला मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही आग कशी लागली, स्फोट नेमका कसा झाला याचा तपास आता अग्नीशमन दल आणि पोलिसांकडून केला जातो आहे.

ही घटना इतकी भीषण होती की धुराचे लोट आणि आगीचे लोळ हे बऱ्याच अंतरावर दिसत होते. अकोला राष्ट्रीय महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली आहे. आग आता नियंत्रणात आली आहे. ही आग नेमकी का लागली याचा शोध आता पोलीस आणि अग्नीशमन दलाकडून घेतला जातो आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in