मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज! 19 फेब्रुवारीपासून 12 एसी लोकलसह 3 नव्या नॉन एसी लोकल सुरू...

मुंबई तक

पश्चिम रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून 12 अतिरिक्त एसी लोकल सेवा आणि 3 नवीन नॉन-एसी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

12 एसी लोकलसह 3 नव्या नॉन एसी लोकल...
12 एसी लोकलसह 3 नव्या नॉन एसी लोकल...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज...

point

19 फेब्रुवारीपासून 12 एसी लोकलसह 3 नव्या नॉन एसी लोकल...

point

पश्चिम रेल्वेचा दिलासाजनक निर्णय

Mumbai News: मुंबई उपनगरीय नेटवर्कवर प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने मोठं पाऊल उचललं आहे. वेस्टर्न रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून 12 अतिरिक्त एसी लोकल सेवा आणि 3 नवीन नॉन-एसी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

संतुलित आणि समावेशक प्रवासाचा अनुभव 

संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वातानुकूलित प्रवासाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन आणि सामान्य प्रवाशांसाठी परवडणाऱ्या पर्यायांची गरज ओळखून, पश्चिम रेल्वेने प्रवाशांना एक संतुलित आणि समावेशक प्रवासाचा अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने ही योजना आखली आहे. 

हे ही वाचा: Govt Job: आता पदवीधरांसाठी RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी... 58,000 पगार अन् आकर्षक सुविधा

तीन नवीन नॉन-एसी सेवा... 

रेल्वे सेवांमधील ही वाढ स्थानकावरील गर्दी कमी करण्यास आणि प्रवाशांना चांगला प्रवास अनुभव देण्यास मदत करेल. मिळालेल्या माहितीनुसार, 12 लोकल सेवा सुरू केल्या जात असून त्यामध्ये 11 विद्यमान नॉन-एसी सेवांची जागा घेतील, तर एक नवीन एसी सेवा असेल. याव्यतिरिक्त, तीन नवीन नॉन-एसी सेवा देखील सुरू केल्या जात आहेत. या वाढीसह, एकूण एसी सेवांची संख्या 121 वरून 133 पर्यंत वाढेल. तसेच, पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील लोकल सेवांची एकूण संख्या 1410 वरून 1414 पर्यंत वाढेल. 

हे ही वाचा: बीड: सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी लावल्याने दोन गटांत वाद; थेट तिघांवर चाकूने हल्ला अन् एक ठार...

अतिरिक्त सुविधा आणि कनेक्टिव्हिटी 

तसेच, शनिवार आणि रविवारी चालवल्या जाणाऱ्या एसी सेवांची संख्या देखील 77 वरून 106 पर्यंत वाढेल आणि त्यामुळे आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वीकेंडला प्रवास करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना अधिक आराम आणि क्षमता उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त, सध्या भाईंदर आणि वांद्रे दरम्यान चालणारी स्लो लोकल सेवा आता विरार येथून चालवली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त सुविधा आणि चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp