Mumbai Tak /बातम्या / Lalu Prasad Yadav यांच्या अडचणी वाढवणार ‘लॅण्ड फॉर जॉब’ घोटाळा काय?
बातम्या राजकीयआखाडा

Lalu Prasad Yadav यांच्या अडचणी वाढवणार ‘लॅण्ड फॉर जॉब’ घोटाळा काय?

CBI News : पाटणा : बिहारच्या (Bihar) माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri devi) यांच्या निवासस्थानी सोमवारी सीबीआयने धडक दिली. यावेळी सीबीआयने राबडी देवी यांची ४ तास कसून चौकशी केली. ‘लॅण्ड फॉर जॉब’ घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती यांना 15 मार्च रोजी कोर्टात हजर राहावं लागणार आहे. हा घोटाळा लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असतानाचा आहे. (CBI has reached the house of Rabri Devi, wife of former Bihar Chief Minister Lalu Yadav. CBI is probing the land for job scam.)

लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात लोकांकडून जमिनी घेतल्याचा दावा केला जात आहे. लालू यादव 2004 ते 2009 यादरम्यान रेल्वेमंत्री होते. या प्रकरणी गेल्या वर्षी 10 ऑक्टोबर रोजी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये 16 जणांना आरोपी करण्यात आले होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये सीबीआयने लालू यादव रेल्वेमंत्री असताना त्यांचे ओएसडी असलेले भोला यादव यांना अटक केली होती.

काय आहे प्रकरण?

आयआरसीटीसी घोटाळा हा लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतानाच्या काळातील आहे. लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना लोकांकडून त्यांना रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात जमिनी घेतल्याचा दावा केला जात आहे. लालू यादव 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री होते. याप्रकरणी सीबीआयने 18 मे रोजी गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, काही लोकांना प्रथम रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांवर भरती करण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबियांनी जमिनीचा व्यवहार केल्यानंतर त्यांना नियमित करण्यात आलं. सीबीआयचे म्हणणं आहे की लालू यादव यांच्या कुटुंबाने पाटण्यात 1.05 लाख चौरस फूट जमिनीवर कथित अतिक्रमण केलं आहे. या जमिनींचा व्यवहार रोखीने झाला. म्हणजेच लालू यादव यांनी कुटुंबाने रोख पैसे देऊन या जमिनी विकत घेतल्या होत्या. सीबीआयच्या म्हणण्यानुसार या जमिनी अत्यंत कमी किमतीत विकल्या गेल्या.

सीबीआयला असंही आढळून आलं की विभागीय रेल्वेमध्ये सबस्टिट्यूटच्या भरतीसाठी कोणतीही जाहिरात जारी करण्यात आली नव्हती. परंतु, ज्या कुटुंबांनी यादव कुटुंबाला आपली जमीन दिली, त्यांना मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथील रेल्वेत नियुक्त्या देण्यात आल्या.

ईडीच्या म्हणण्यानुसार, काही उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्याची घाई करण्यात आली होती. काही अर्ज तीन दिवसांत मंजूर करण्यात आले. पश्चिम मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने पूर्ण पत्ता नसतानाही उमेदवारांचे अर्ज मंजूर केले आणि नियुक्त केले. लालू यादव आणि कुटुंबीयांनी जमिनीच्या बदल्यात 7 उमेदवारांना नोकऱ्या दिल्याचा आरोप आहे. यातील पाच जमिनी विकल्या गेल्या, तर दोन भेट म्हणून देण्यात आल्या.

ती ‘सात’ प्रकरण कोणती?

डील 1 : सीबीआयला प्राथमिक तपासात असं आढळून आलं की 6 फेब्रुवारी 2008 रोजी पाटणा येथील रहिवासी किशून देव राव याने राबडी देवींच्या नावावर 3 हजार 375 चौरस फूट जमीन केली होती. ही जमीन 3.75 लाख रुपयांना विकली गेली. त्याच वर्षी, राव यांच्या कुटुंबातील तीन सदस्य, राज कुमार सिंह, मिथिलेश कुमार आणि अजय कुमार यांना मुंबईतील ग्रुप डी मध्ये भरती करण्यात आले.

Maharashtra: नाना पटोले राहणार की जाणार? काँग्रेस मोठ्या निर्णयाच्या तयारीत

डील – 2 : नोव्हेंबर 2007 मध्ये पाटणा येथील रहिवासी किरण देवी यांनी तिची 80,905 चौरस फूट जमीन लालू यादव यांची मुलगी मिसा यांना विकली.. हा सौदा 3.70 लाख रुपयांना झाला होता. नंतर, त्याचा मुलगा अभिषेक कुमार याला बदली म्हणून मुंबईत भरती करण्यात आले

डील 3 : मार्च 2008 मध्ये ब्रज नंदन राय यांनी 3,375 स्क्वेअर फूट जमीन गोपालगंज येथील रहिवासी हृदयानंद चौधरी यांना 4.21 लाख रुपयांना विकली. हृदयानंद चौधरी यांची 2005 मध्ये हाजीपूरमध्ये बदली म्हणून भरती करण्यात आली होती. नंतर हृदयानंद चौधरी यांनी ही जमीन लालू यादव यांची मुलगी हेमा यांच्या नावावर केली. हृदयानंद चौधरी हे लालू यादव यांचे नातेवाईक नसल्याचे सीबीआयला आढळून आले आणि ज्यावेळी ही जमीन देण्यात आली त्या वेळी त्याची किंमत 62 लाख रुपये होती.

डील 4 : महुआबाग, पाटणा येथील रहिवासी असलेल्या संजय राय यांनी 3,375 स्क्वेअर फुटाचा भूखंड फेब्रुवारी 2008 मध्ये राबडी देवी यांना विकला. हा सौदा 3.75 लाख रुपयांना झाला होता. सीबीआयला तपासात आढळून आले की, त्या बदल्यात संजय राय आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना रेल्वेत नोकरी देण्यात आली.

डील 5 : पटना येथील रहिवासी हजारी राय यांनी फेब्रुवारी 2007 मध्ये 9,527 चौरस फूट जमीन 10.83 लाख रुपयांना एके इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेडला विकली. नंतर हजारी राय यांचे दोन पुतणे दिलचंद कुमार आणि प्रेमचंद कुमार यांना रेल्वेत नोकरी मिळाली. 2014 मध्ये एके इन्फोसिस्टमच्या सर्व मालमत्ता आणि अधिकार राबडी देवी आणि मिसा भारती यांच्याकडे गेल्याचे तपासात समोर आले. 2014 मध्ये, राबडी देवी यांनी या कंपनीचे बहुतांश शेअर्स विकत घेतले आणि त्या डायरेक्टर झाल्या.

Maharashtra Weather update : अवकाळी झोडपणार, IMD कडून 6 जिल्ह्यांना इशारा

डील 6 : मे 2015 मध्ये पाटणा येथील रहिवासी असलेल्या लाल बाबू राय यांनी 1360 स्क्वेअर फूट जमीन राबडी देवी यांना 13 लाख रुपयांना विकली. 2006 मध्ये लाल बाबू राय यांचा मुलगा लालचंद कुमार याला रेल्वेत सबस्टिट्यूट म्हणून भरती करण्यात आल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे.

डील 7 : मार्च 2008 मध्ये विशुन देव राय यांनी आपली 3,375 स्क्वेअर फूट जमीन सिवान येथील रहिवासी लालन चौधरी यांना विकली. त्याच वर्षी लालनचा नातू पिंटू कुमार याला पश्चिम रेल्वेत सबस्टिट्यूट म्हणून भरती करण्यात आले. यानंतर फेब्रुवारी 2014 मध्ये लालन यांनी ही जमीन लालू यादव यांची मुलगी हेमा यादव यांना दिली.

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा