Maharashta Assembly : ‘त्यावेळी खरं बोलत होतो, काळजी घेतली असती, तर…’ -एकनाथ शिंदे
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या कायदा सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी यासह विविध मु्द्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी आणि इतर मुद्दे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केले. […]
ADVERTISEMENT

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या कायदा सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी यासह विविध मु्द्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं.
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी आणि इतर मुद्दे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केले. विरोधी पक्षनेत्यांनी गुन्हेगारीवाढीकडे सभागृहाचं लक्ष वेधलं.”
“भारतात भौगोलिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर, तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण इंडियाच्या अहवालानुसार गुन्हेगारीत देशात ११वा क्रमांक आहे. आमचं सरकार येऊन दीड महिनाच झाला आहे.”
“पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मृतदेह फेकून दिल्याची घटना घडली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आलीये. कन्नडमध्येही सहा नराधमांनी मुलीवर अत्याचार केले. पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.”