फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात येऊ घातलेला फॉक्सकॉन कंपनीचा 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला पळवण्यात आला आहे. सेमीकंडक्टर निमिर्ती प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारडून तैवानमधील कंपनीसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात होती. मात्र, आता हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये वेदांता कंपनी उभारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता हा प्रकल्प गुजरातला कसा गेला यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

”दोन वर्षांपूर्वी वेदांता कंपनीला ज्या सवलती द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या होत्या. परंतु नेमकं दोन वर्षांमध्ये त्याचा फॉलोअप घेतला गेला नाही. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करून तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू.” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

शिंदे गटाकडून २० ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यभर दौरा

शिंदे गटाच्या आमदार-खासदारांची काल मुंबईमध्ये बैठक पार पडली. यावेळी संघटनात्मक दृष्ट्या पदाधिकारी आमदार खासदार यांची बैठक घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी यात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे आणि सरकारचे काम तळागाळातील आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम होणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दसरा मेळाव्याबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मागच्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. शिंदे गटही आता मेळावा घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कार्यकर्त्यांची मागणी आहे म्हणून दसरा मेळावा घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसेच त्याबाबत त्याचे ठिकाणही लवकर सांगितले जाईल असेही शिंदे म्हणाले.

शिंदे गट हिंदुत्त्वाचं रणशिंग फुंकणार

एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत काल मुख्य स्टेजवर ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं घोष वाक्य लिहिलेलं बॅनर लावण्यात आलं होतं. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला शिंदे गटाकडून हिंदूत्वाचं रणशिंग फुंकणार हे आता स्पष्ट झालं आहे. तसेच येत्या २० ते ३० सप्टेंबर दरम्यान शिंदे गटाकडून राज्य भर हिंदू गर्व गर्जना यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरा करणार असल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT