राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले... - Mumbai Tak - chief minister eknath shindes reaction after raj thackerays meeting - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकीय समीकरणांवर चर्चा केली का? हा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी याबाबत उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली त्यानिमित्त भेट घेतली. तसंच गणरायाचं दर्शन घेतलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काय म्हटलं […]

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकीय समीकरणांवर चर्चा केली का? हा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी याबाबत उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली त्यानिमित्त भेट घेतली. तसंच गणरायाचं दर्शन घेतलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?

सगळीकडे गणपतीचं आगमन झालं आहे. सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपण पाहतो आहे. गणेश उत्सवानिमित्त आम्ही सगळेच जण एकमेकांकडे जात असतो. आज मी गणेश उत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या घरी आलो. गणरायाचं दर्शन घेतलं. त्यांची सदिच्छा भेट घेतली. राजकीय चर्चा काहीही झालेली नाही. मध्यंतरी राज ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली त्यामुळे त्याविषयी चर्चा केली. राजकीय चर्चा झालीच नाही त्यामुळे नव्या समीकरणांची नांदी झाली असं काही म्हणता येणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आनंद दिघे यांच्या आठवणींना दिला उजाळा

आम्ही पूर्वी एकत्र काम करत होतो. आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा मिळाला. सगळे आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनात सगळ्यांनी काम केलं आहे. राज ठाकरेंनीही बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात काम केलं आहे.महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे पोस्टर लावण्यात आलं त्याबाबत मी एवढंच म्हणेन की हे सगळं जनता ठरवते. मला अतिशय आनंद वाटतो आहे लोकांना हे वाटतं आहे. कमी वेळात आम्ही अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. आमचं शिवसेना भाजपचं सरकार हे लोकांचं सरकार आहे. राज ठाकरे आणि माझ्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दसरा रॅलीबाबत आपण नंतर बोलू ना, आधी गणेश उत्सव होऊ द्या, मग नवरात्र आहे त्यानंतर दसरा येतो. असं म्हणत दसरा मेळावा घेणार का? याबाबतच्या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी टाळलं.

शिवसेनेची स्पेस राज ठाकरे घेणार का?

शिवसेनेत दोन गट पडल्याने तसंच उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका झाली. तसंच शिवसेनेने केलेल्या या खेळीमुळे जी स्पेस निर्माण झाली. ती स्पेस भरून काढण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. अशात एप्रिल महिन्यात राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला मेळावा घेतला. त्यानंतर ज्या उत्तर सभा आणि इतर सभा घेतल्या त्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने पुढे आणला. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =

…तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम?