उत्तराखंडमध्ये चिनी सैनिकांनी केली होती घुसखोरी, पुलाचंही केलं नुकसान?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लडाखच्या पूर्व भागात ताणाताणी झाल्यानंतर आता चीनने उत्तराखंडमध्ये नापाक कारवाई केली. एका वृत्त संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार चिनी लष्कराचे 100 हून अधिक जवान सीमा ओलांडून भारतात घुसले. हे सैनिक उत्तराखंडच्या बाराहोती भागात गेले होते. रिपोर्टनुसार ही घटना 30 ऑगस्टची आहे.

या घुसखोरीनंतर काही तासांनी उत्तराखंडच्या बाराहोती भागातून चिनी सैनिक परतले होते. तुन जुनला पास ओलांडून चीनचे 100 पेक्षा जास्त सैनिक हे भारतात घुसले होते. पाच किमीपर्यंत आत येत त्यांनी ही घुसखोरी केली होती. अशीही माहिीत मिळाली आहे की एका पुलाचंही या सैनिकांनी नुकसान केलं. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

काय आहे राहुल गांधी यांचं ट्विट?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जुमला-घर में घुस के मारेंगे

सच-चीन हमारे देश में घुस के मार रहा है

ADVERTISEMENT

असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.

ADVERTISEMENT

100 पेक्षा जास्त सैनिकांनी घुसखोरी केल्याचं वृत्त सुरक्षा यंत्रणांनी नाकारलं आहे. या संबंधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी सैनिकांनी एक पूल पाडल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र बाराहोती भागात असा कुठला पूलच नाही. आणखी एक माहिती अशी समोर आली आहे की बाराहोती भागात एक गुरांना चरण्यासाठी सोडलं जातं ते मैदान आहे. 60 स्क्वेअर किमी भागात है मैदान पसरलं आहे या मैदानातून दोन्ही देशांमधले गुराखी, मेंढपाळ येत जात असतात. या ठिकाणी लष्कराकडून फारशी पेट्रोलिंग केली जात नाही. बाराहोती भागात स्थानिक प्रशासकीय पथकं वेळोवेळी पाहणी करत असतात. बाराहोती मध्ये गेल्या काही दशकांपासून एक पद्धत आहे ती म्हणजे दोन्ही देशांकडून कोणतंही लष्कर या भागात येणार नाही.

या भागात भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे जवान तैनात आहेत. भारतीय सैनिकांना सूचना मिळाल्यानंतर या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली होती. रिपोर्टसमध्ये दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांच्या सीमांवरून या ठिकाणी अस्पष्टता आहे त्यामुळे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहेत. 30 ऑगस्टला भारतीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सीमेवर चिनी सैनिक आल्याचं पाहिलं होतं. याआधी 2018 मध्येही अशी एक घटना घडली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT