इंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, महिलांना छळायची शिकवण देताय का?
अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात पारनेरच्या तहसीलदारांनी केलेल्या गंभीर आरोपांची चर्चा होत आहेत. याच प्रकरणात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला असून, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी इंदुरीकर महाराजांवर टीकास्त्र डागलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झालेली आहे. ज्योती देवरे […]
ADVERTISEMENT

अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात पारनेरच्या तहसीलदारांनी केलेल्या गंभीर आरोपांची चर्चा होत आहेत. याच प्रकरणात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला असून, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी इंदुरीकर महाराजांवर टीकास्त्र डागलं आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झालेली आहे. ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपांमुळे नवा वाद उभा राहिला आहे. दरम्यान, हे प्रकरण चर्चेत असतानाच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या विधानाने आणखी एक वाद उभा राहण्याची चिन्हं असून, इंदुरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
‘राज्यातील भोळ्याभाबड्या भगिनी मन लावून ज्यांचं किर्तन ऐकतात, त्या ह.भ.प.नी एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होणाऱ्या त्रासाची तुलना ‘कुत्री भुंकतात’ अशी करणं अतिशय दुदैवी… या सत्तेतील बेलगाम घोड्यांना ‘हत्ती’ म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का??’, असा सवाल करत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.