Ravi Rana: मुख्यमंत्री ठाकरेंची परदेशात अवैध संपत्ती, सगळी माहिती ED आणि CBI ला देणार: रवी राणा

MLA Ravi Big accusation on CM Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी परदेशात अवैध संपत्ती जमा केली असल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणांनी केला आहे.
Ravi Rana: मुख्यमंत्री ठाकरेंची परदेशात अवैध संपत्ती, सगळी माहिती ED आणि CBI ला देणार: रवी राणा
रवी राणा यांचे मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप (फोटो सौजन्य - Twitter)

धनंजय साबळे, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'उद्धव ठाकरे यांची परदेशात अवैध संपत्ती आहे. याची संपूर्ण माहिती मी गोळा केली आहे. त्यांच्या ह्या संपत्तीविषयी कागदपत्रासह सर्व माहिती ED आणि CBI ला देणार आहे. असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर-राणा (Navneet Kaur-Rana) यांना शिवसेना टार्गेट करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 'उद्धव ठाकरे हे द्वेषाचे राजकरण करत असून वेगवेगळ्या कारणाने ते माझ्या पत्नी नवनीत राणा व मला टार्गेट करत आहेत. पण ठाकरे यांनी विसरू नये की, त्यांनी परदेशात जी अवैध पद्धतीने संपत्ती जमा केली आहे ज्यामध्ये हॉटेल, जमिन, घर आहे या सगळ्याची माहिती मी ED ला देणार आहे.

याचवेळी रवी राणा यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील निशाणा साधला. अनिल परब यांच्या देखील अवैध रिसॉर्टची माहिती मी कागदपत्रासह ED ला देणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

रवी राणा यांचे मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप
Navneet Rana: खासदार नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' निर्णयाला स्थगिती

रवी राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

जेव्हापासून नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी त्यांच्या तक्रारी केल्या. अनुसुचित आयोगाकडे तक्रार केल्या. त्या ठिकाणी त्या जिंकल्या. पण असं असताना हायकोर्टाने अचानक असा निर्णय देणं हा मोठा धक्का होता. त्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागितला. ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली. जो आमच्यासाठी मोठा दिलासा आहे.

मात्र, ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून नवनीत राणा, रवी राणा यांना टार्गेट करुन द्वेषाचं राजकारण केलं आहे.

रवी राणा यांचे मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप
Navneet Rana: नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र का रद्द झालं... खासदारकी गमवावी लागणार?

मी स्वत: उद्धव ठाकरे यांची अवैध संपत्ती आहे जी इतर वेगवेगळ्या देशात आहे. त्या संपत्तीची पूर्ण माहिती घेतलेली आहे. ज्या ठिकाणी त्यांचे हॉटेल आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या जमिनी आणि घर आहे अशा ठिकाणची माहिती घेतलेली आहे आणि ईडी आणि सीबीआयला याची सविस्तर माहिती देणार आहे. त्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे.

असे गंभीर आरोप रवी राणा यांनी केली आहे. त्यामुळे आता या आरोपांना शिवसेनेकडून काही उत्तर मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in