Sakinaka Rape case : ‘काळीमा फासणारे कृत्य’; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

मुंबईतल्या साकीनाका भागात एका महिलेवर बलात्कार झाला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्यात आला तिला मारहाणही करण्यात आली. 9 सप्टेंबरच्या रात्री उशिरा ही घटना साकीनाका भागात घडली. या घटनेने मुंबई हादरली आहे. या बलात्कार पीडित महिलेला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाले संजय राऊत?

मुंबईमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला, तिच्यासोबत पाशवी कृत्य झालं. तिला रूग्णालयात आणलं गेलं तेव्हाच तिची अवस्था खूपच नाजूक होती. जी घटना घडली ती अत्यंत धक्कादायक घटना आहे. मुंबईत महिलांना सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातल्या सुरक्षित शहरांमध्ये मुंबईचं नाव येतं. मात्र साकीनाका भागात जी घटना घडली त्यातल्या आरोपीलाही अटक करण्यात आली आङे. हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मात्र या प्रकरणाचं विरोधकांनी राजकारण करू नये, गोंधळ उडवून सरकार चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये. कारण अशा प्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात. महिलेचा जबाब नोंदवता आला असता तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्यात. मात्र पोलिसांनी आता मुख्य आरोपीला पकडलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

साकीनाका बलात्कार प्रकरणावर विरोधी पक्ष सरकारवर आरोप करत आहे. त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपीला जी कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे हीच आमचीही भावना आहे. फास्ट ट्रॅक पद्धतीने हा खटला चालला पाहिजे. या घटनेची तुलना दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाशी केली जाते आहे. ही तुलना करायला हरकत नाही, या महिलेने जीव गमावला आहे. यासारख्या दुर्दैवी घटना घडू नये म्हणून यासाठी सरकारला अधिक कठोर पावलं उचलावी लागतील आणि ती उचलल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT