दादागिरी करुन घरी येणार असाल तर…उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणा दाम्पत्याला सुनावलं

मुंबई तक

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठनाच्या वादावरुन अटकेत असलेल्या नवनीत आणि रवी राणा या दाम्पत्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा समाचार घेतला आहे. आमच्या घरी यायचं असेल तर जरुर या, पण दादागिरी करुन येणार असाल तर ती कशी मोडायची हे आम्हाला बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत शिकवल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईत ‘बेस्ट’ च्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठनाच्या वादावरुन अटकेत असलेल्या नवनीत आणि रवी राणा या दाम्पत्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा समाचार घेतला आहे. आमच्या घरी यायचं असेल तर जरुर या, पण दादागिरी करुन येणार असाल तर ती कशी मोडायची हे आम्हाला बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत शिकवल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबईत ‘बेस्ट’ च्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसेच्या वादापासून ते भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याचा समाचार घेतला. “बाळासाहेब, माँ असल्यापासून आमच्याकडे अनेक लोकं यायची. आमच्या घरी येऊन हनुमान चालीसा म्हणायची असेल तर म्हणा, पण त्याला एक पद्धत असते. आमच्याकडे दिवाळी असो किंवा नसो साधू-संत येत असतात. परंतू ती येताना आम्हाला सांगून यायची की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. आम्ही त्यांचं स्वागतच करतो. तुम्ही आलात तर तुमचंही स्वागत करु, पण दादागिरी करुन येणार असाल तर ती कशी मोडायची हे बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाच्या व्याख्येत शिकवलं आहे.”

राणा चालीसा वाचतात की नाही याच्याशी सर्वसामान्यांना घेणंदेणं नाही; सुजय विखेंचा वेगळा सूर

या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपचाही समाचार घेतला. बाबरी मशीद पडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. राम मंदीर बांधण्याचा निर्णयही तुम्हाला कोर्टाने आदेश दिल्यानंतर घ्यावा लागला आणि त्यासाठीही तुम्ही झोळ्या पसरल्यात. घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनेचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. रामदास स्वामींनी भीमरुपी महारुद्रा हे स्तोत्र लिहून ठेवलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अंगावर याल भीमरुप आणि महारुद्र तुम्हाला पहायला मिळेल. बाळासाहेबांनी आम्हाला हेच सांगितलं आहे. हिंदूत्व हे घंटाधारी नसावं तर अतिरेक्यांना बडवणारं असावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘दुसऱ्याच्या घरात हनुमान चालीसा वाचून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा का आणता?’ हायकोर्टाने राणांना झापलं

यावेळी उद्धव ठाकरेंनी आपण लवकरच जाहीर घेणार असल्याचं. या सभेत तकलादू आणि नवहिंदूत्ववाद्यांचा समाचार घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. तसेच या सभेत मी मास्क न घालता बोलणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Devendra Fadnavis: भर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी केलं हनुमान चालीसाचं पठण; म्हणाले.. हा राजद्रोह..!

हे वाचलं का?

    follow whatsapp